Mumbai Rain : राज्यातकुठेमान्सूनपूर्व पावसाच्या (Rain)सरीकोसळतआहे. तरकुठेतपमानाचाकहरपाहायलामिळतआहे. अशातचआता मुंबईच्या पश्चिम उपनगरात देखील जोरदार पावसाला (Mumbai Rain) सुरुवात झाली आहे . पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव मालाड, विलेपार्ले, सांताक्रुज या सर्व भागात पहाटे पाच वाजेपासून पावसाला सुरुवात झाली आहे . मागील काही दिवसापासून मुंबईकर उष्णता आणि उकाड्याने त्रस्त झाले होते . अशातच आता मुंबई आणि उपनगरात पावसा च्या सरी कोसळ ल्या ने उकाड्यापासून हैराण झालेले मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
(Maharashtra Weather Update)
Mumbai Rain : पुढील 3 तासांसाठी पालघरसह मुंबईला यलो अलर्ट
दरम्यान, हवामान विभागाकडूनआज (दिनांक 31मे 2026 ) पुढील 3 तासांसाठी यलो अलर्टजारीकेलाआहे. यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि हलक्या पावसाची दाट शक्यता असून, सोसाट्याचा वारा ताशी 30-40 किमी वेगाने वाहण्याची दाट शक्यता आहे. परिणामी मुंबई आणि पालघरमध्येपाऊसकोळण्याचीशक्यतावर्तवण्यातअसलीअसूनत्याअनुषंगाने खबरदारी घेण्याच्यासूचनामुंबईहवामानविभागाकडून (Mumbai IMD) करण्यातआल्याआहे. मुंबईत अचानक ढगांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली असून उकाड्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील अनेक भागांत पावसाच्या सरी कोसळत असून वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही तास पावसाची तीव्रता वाढू शकते.
Monsoon Rain: मुंबईमध्ये रविवारपासून तीन दिवस हलक्या सरींची शक्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईमध्ये रविवारपासून सलग तीन दिवस हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बरसतील. याशिवाय, पालघर आणि ठाणे जिल्ह्यासाठी रविवारी हलक्या सरी तर सोमवारी मेघगर्जनेसह (Thunderstorm) पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही सोमवार आणि मंगळवारी मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता असल्याने तेथेही 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
Vidarbha Rain Update : विदर्भातही पावसाची जोरदार बॅटिंग
दुसरीकडे विदर्भातहीतापमानाच्याउद्रेकानंतरआतापावसाच्यासरीकोसळल्याआहेत. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात आज सकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानेबॅटिंगकेलीआहे. एक तासापासून सुरू असलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माणझालाअसून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाआहे.
Bhandara Rain : भंडाऱ्यात विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
भंडाऱ्यात सायंकाळी वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली. मागील काही दिवसांपासून भंडाऱ्याच तापमान 45 अंश डिग्री सेल्सिअसवर पोहोचल्याने प्रचंड उकडा निर्माण झाला होता. या उकळ्यामुळे नागरिकांसह पाळीव जनावर आणि पशुपक्षीही हैराण झाले होते. भंडारा शहरासह ग्रामीण भागातही आज सायंकाळच्या सुमारास आलेल्या या मान्सूनपूर्व पावसानं वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उकड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
Author : सत्यम सिंह

