Nagpur Fire Brigade Viral Video: नागपुरात (Nagpur) दुचाकीला लागलेल्या आगीवेळी अग्निशमन दलाच्या गाडीत पाणी नसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफानव्हायरल झाला होता. त्यानंतर नेटकाऱ्यांनी यावर जोरदार टीका करत अनेक प्रश्न उपस्थित केले होते . मात्र एकंदरीत या सर्व प्रकारावर आता अग्निशाम न दलाने (Nagpur Fire Brigade) स्पष्टीकरण देत गाडीत पाणी नसल्याचा दावा खोटा असून काही तांत्रिक बिघाडामुळे आग विझवण्यासाठी पाण्याचा मारा करणे शक्य झाले नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
त्यामुळेसोशलमीडियावर व्हायरल पोस्टमधील (Social Media Post) दाव्याततथ्यनसल्याचेसमोरआलंआहे. (Nagpur Fire Brigade Viral Video)
नेमका प्रकार काय? (Nagpur Fire Brigade Viral Video)
नागपूरच्या राणी दुर्गावती चौकात एका इलेक्ट्रिक स्कूटरला अचानक आग लागल्याचीघटनाघडलीहोती. त्यानंतर याघटनेचीतात्काळमाहिती अग्निशामन दलाला (Fire Brigade) देण्यातआली. दरम्यान, माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे मिनी टेंडर घटनास्थळी पोहोचले. परंतु काही तांत्रिक बिघाडामुळे गाडीवरपाणीमारण्यासअडचणीआल्या. परिणामी 'गाडीत पाणीच नसल्याने आग विझवता आली नाही' असा दावा करणारा एकव्हिडीओएकानेशूटकरूनतो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्टकेला. बघताबघताहाव्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. मात्र, व्हायरल होत असलेला व्हिडिओ वस्तुस्थितीला धरून नसून अर्धवट माहितीवर आधारित असल्याचे अग्निशमन विभागाने स्पष्ट केले.
Nagpur Fire Brigade: मिनी टेंडरच्या इंजिनमधून पंपला मिळणाऱ्या वीज पुरवठ्याच्या सर्किटचा फ्युज उडाला, म्हणून...
'मिनी टेंडरच्या इंजिनमधून पंपला मिळणाऱ्या वीज पुरवठ्याच्या सर्किटचा फ्युज उडाल्याने अग्निशमन दलाच्या गाडीचा पंप सुरू होऊ शकला नाही, परिणामी तांत्रिक बिघाडामुळे पंप सुरू होऊ शकला नाही', असे स्पष्टीकरण अग्निशमन विभागाकडून देण्यात आले, तसेच तातडीने दुसरी मोठी गाडी घटनास्थळी रवाना करण्यात आली. परंतु त्यापूर्वी स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले होते. अशीमाहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आलीआहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Author : रजत वशिष्ठ, एबीपी माझा

