Dailyhunt
Nana Patekar Gym Video: 76 वर्षांच्या नाना पाटेकरांचा जीममधील वर्कआउट पाहून मिलिंद सोमणला फुटेल घाम; गळ्यात गमछा अन् ताणलेल्या शिरा..; Video

Nana Patekar Gym Video: 76 वर्षांच्या नाना पाटेकरांचा जीममधील वर्कआउट पाहून मिलिंद सोमणला फुटेल घाम; गळ्यात गमछा अन् ताणलेल्या शिरा..; Video

ABP माझा 2 weeks ago

Nana Patekar Gym video viral : हिंदी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेत्यांचा उल्लेख झाला की नाना पाटेकर (Nana Patekar) यांचं नाव नक्की घेतलं जातं. अभिनयासोबतच ते त्यांच्या जबरदस्त फिटनेस आणि एनर्जीसाठीही ओळखले जातात.

सध्या त्यांचा एक नवीन व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये 76 वर्षीय नाना पाटेकर जिममध्ये व्यायाम (Gym Workout) करताना दिसत आहेत. गळ्यात गमछा घालून त्यांनी केलेली कसरत पाहून चाहते थक्क झाले आहेत. एवढ्या वयात फिटनेससाठीची त्यांची जिद्द पाहून सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे. अभिनेते नाना पाटेकर यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालतोय . (Viral Video)

76 व्या वर्षी नानांचा बेफाम व्यायाम

जिम वर्कआउटमुळे नाना पाटेकर यांचं नाव याआधीही अनेकदा चर्चेत आलं आहे, ज्यावरून ते फिटनेसबाबत किती गंभीर आहेत, हे स्पष्ट होतं. त्यांचा हा लेटेस्ट व्हिडिओही त्याचाच पुरावा आहे.चित्रपट निर्माता आणि फोटोग्राफर अतुल कसबेकर यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात नाना पाटेकर जिममध्ये घाम गाळताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, 76 व्या वर्षी त्यांनी 15 वेळा डिप्स मारल्या आहेत. बार डिप्स ही कठीण एक्सरसाइज मानली जाते, आणि ती योग्य पद्धतीने करणं सोपं नसतं. मात्र नाना पाटेकर यांनी ती सहजतेने केल्याचं पाहायला मिळतं.

यामुळे सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असून त्यांच्या एनर्जी आणि डेडिकेशनचं कौतुक केलं जात आहे.

या प्रोजेक्टमध्ये दिसणार नाना पाटेकर

यावर्षी नाना पाटेकर हे शाहिद कपूर अभिनीत 'ओ रोमियो' चित्रपटात आणि 'संकल्प' या वेब सीरिजमध्ये झळकले होते. या दोन्ही प्रोजेक्ट्सना चांगला प्रतिसाद मिळाला. आगामी प्रोजेक्टबाबत बोलायचं झाल्यास, ते 'संकल्प'च्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहेत. ही वेब सीरिज लवकरच Amazon MX Player या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Author : जयदीप मेढे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha