Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
​Nanded Crime News : नांदेडमध्ये रक्तरंजित घटनांचा थरार! 70 तासांत पाच हत्येच्या घटना; नागरिकांमध्ये भीती, पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह

​Nanded Crime News : नांदेडमध्ये रक्तरंजित घटनांचा थरार! 70 तासांत पाच हत्येच्या घटना; नागरिकांमध्ये भीती, पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह

ABP माझा 1 month ago

Nanded Crime News : ​नांदेड शहरात कायदा आणि पोलिसांचा (Police) धाक उरला नाहीये का? असा प्रश्न आता नंदेडकरांना भेडसावू लागला आहे. कारण शहरातील भीतीच्या दहशतीची लक्तरं वेशीवर टांगणाऱ्या पाच हत्येच्या (Nanded Crime News) घटना घडल्या आहे.

नांदेड शहरात अवघ्या 70 तासांच्या कालावधीत शहरात तब्बल पाच खुनाच्या (Crime News) घटना घडल्या आहे. परिणामी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. सोबतच गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या रक्ताच्या खेळामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. (Nanded Crime News)

अशातचआज (6 एप्रिल रोजी) पहाटे श्रीनगर परिसरातील बीके हॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोनू कल्याणकर या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. सोनू हा एका पुरस्कारप्राप्त शिक्षिकेचा मुलगा असून, जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

Nanded Police : पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, पोलीस उपअधीक्षक रामेश्वर व्यंजने यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून तपासाची चक्रे फिरवली असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या तिहेरी हत्याकांडानंतर काल एका तरुणाचा आणि आज पहाटे पाचवा खून झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दरम्यान, ​सततच्या या रक्तरंजित घटनांमुळे नांदेडकरांमध्ये प्रचंड संताप आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला आहे की नाही, असा सवाल नागरिक विचारत आहेत. या वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यासाठी नागरिकांनी आक्रमक मागणी केली असून शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

​Nanded Crime News : जुन्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती

नांदेडच्या श्रीनगर परिसरातील बीके हॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर पहाटे 6 ते 6.30च्या सुमारास सोनू कल्याणकर याच्यावर धारदार शस्त्र आणि वार करत त्याची हत्या करण्यात आली आहे. ही हत्या जुन्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. भाग्यनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतही घटना झालेली आहे. तीन दिवसांमध्ये हा पाचवा खून आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Author : अभिषेक एकबोटे, एबीपी माझा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha