Nanded News : सध्याराजकारणम्हटलंतरएकतर कुटुंबीयांचीराजकीयपार्श्वभूमीहवी, किंवाकिमानआर्थिकभक्कमबाजूतरीहवीच, असासर्वसाधारणसमजदृढहोतानाचेचित्रआहे. तरदुसरीकडेएकापक्षातअपेक्षितसंधीमिळत नसली तर लगेच दुसरा पर्याय शोधात पक्षांतरा च्या ही घटना सर्रास घडतांना बघायला मिळ त असतात . मात्र या साऱ्यांना छेद देणा री आणि पक्ष निष् ठे चं उदाहरण घालून देणारी एक हृदयस्पर्शी प्रसंग नांदेडजिल्ह्याच्या राजकारणात घडल्याचे समोर आलं आहे .
Nagar Parishad Election 2026: नगर परिषदेच्या निवडणुकीसाठीसर्वस्वपणाला, पण...
राजकारणात अनेक मोठे नेते, मोठ्या सभा आणि मोठमोठ्या घोषणा नेहमीच चर्चेत असतात. पण एखाद्या सामान्य कार्यकर्त्याच्या डोळ्यातलं दुःख ओळखून त्याच्या पाठीशी उभं राहणारे नेते फार कमी असतात. ही गोष्ट आहे भोकरच्या एका निष्ठावंत कार्यकर्त्याची. माधव वडगावकर असंया शिवसैनिकाचेनावअसून माधव वडगावकर हे भोकर तालुक्यातील रहिवासी असून शिवसेना शिंदे गटाच्या तालुकाप्रमुख पदावर कार्यरत आहेत. अनेक वर्षा पासून ते पक्षाचे काम करत होते. दरम्यान, त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधून आपल्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. यासाठी त्यांनी स्वतःची 22 गुंठे जमीन विकली होती. शेती विकून आलेले पैसे निवडणुकीत खर्च केले, पण त्यांच्या पत्नीचा थोडक्यात पराभव झाला. निवडणुकीसाठी होतंनव्हतंतेपणालालावलं, 22 गुंठे शेतजमीन विकली, मात्र विजयाचा गुलाल काही लागला नाही. असं असताना देखील या कार्यकर्त्याने पक्षासोबत असलेली निष्ठा काही सोडली नाही. उलट रस्त्यावर येऊन पक्षाचं काम करणे सुरूच ठेवले. मात्रहि बाब जेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनासमजलीतेव्हात्यांनी माधव वडगावकरला मदती हातदेतमोठादिलासादिला. पत्नीच्याविजयासाठी निवडणूकीत विकेलेली शेती परत मिळवून दिली. जमीन परत मिळताच त्या कार्यकर्त्याला गहिवरून आले आणि त्याच्या अश्रूंचा बांध फुटला.
22 गुंठे शेतजमीन विकली, मात्र विजयाचा गुलाल काही लागला नाही; तरीहीपक्षसर्वस्वी
निवडणूकलढवतअसतानाथोडक्यातपराभवालासमोरजावंलागलं. परिणामीखर्चासाठी शेती विकावीलागली. होतंनव्हतंतेगमावल्यानंतर माधव वडगावकर हे रस्त्यावर आले. त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत होता. ही बाब शिवसेनेच्या नेत्यांना समजली, पण त्यांच्याकडून कुठलीच मदत मिळाली नाही. तरीदेखील नगर परिषद निवडणुकीत त्यांनी स्वतःचा दिवस-रात्र विचार केला नाही. घर, संसार, कुटुंब या सगळ्यांपेक्षा पक्षाला प्राधान्य दिलं. कार्यकर्त्यांच्या बैठका, प्रचाराची धावपळ, लोकांपर्यंत पक्ष पोहोचवण्याची धडपड आणि या सगळ्यात वाढत गेलेला निवडणुकीचा खर्च. परिस्थिती इतकी कठीण झाली की पक्षासाठी लढताना त्यांच्यावर स्वतःची शेती विकण्याची वेळ आली.
'....असं कधी वाटलं नव्हतं, साहेब मी कायम तुमच्या ऋणात राहील
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेनेची आढावा बैठक सुरू होती. त्याच बैठकीत काही कार्यकर्त्यांनी माधव वडगावकर यांची ही परिस्थिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली. एक कार्यकर्ता पक्षासाठी 22 गुंठे शेती विकतो, ही गोष्ट ऐकताच डॉ. श्रीकांत शिंदे भावूक झाले. बैठक संपल्यानंतर त्यांनी तात्काळ माधव वडगावकर यांना मुंबईला बोलावून घेतलं. त्यांच्याशी शांतपणे संवाद साधला, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्यांना धीर देत एकच शब्द दिला 'तुम्ही पक्षासाठी इतकं केलं आहे. आता तुमच्यासाठी आम्ही उभे आहोत.' त्यानंतर डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेत संबंधितांशी संपर्क साधला, आवश्यक आर्थिक व्यवहार पूर्ण केले आणि काही दिवसांतच विकलेली शेती पुन्हा माधव वडगावकर यांच्या ताब्यात मिळवून दिली. त्या दिवशी फक्त एक जमीन परत मिळाली नाही, तर एका निष्ठावंत कार्यकर्त्याच्या डोळ्यात पुन्हा आत्मविश्वास परत आला. 'आम्ही पक्षासाठी काम करतो… पण आमच्या अडचणीच्या काळात एवढ्या ताकदीने कोणी पाठीशी उभं राहील, असं कधी वाटलं नव्हतं, साहेब मी कायम तुमच्या ऋणात राहील' अशा भावना माधव वडगावकर यांनी व्यक्त केल्या.
Author : एबीपी माझा वेब टीम

