Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Nashik Ring Road Controversy: नाशिकमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! प्रांत अधिकारी पवन दत्ता यांच्या 'पिंडदानाचा' कार्यक्रम पोलिसांनी रोखला, नेमकं काय घडलं?

Nashik Ring Road Controversy: नाशिकमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! प्रांत अधिकारी पवन दत्ता यांच्या 'पिंडदानाचा' कार्यक्रम पोलिसांनी रोखला, नेमकं काय घडलं?

ABP माझा 1 week ago

 नाशिकचे प्रांत अधिकारी पवन दत्ता यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या बाधित शेतकऱ्यांचा 'पिंडदान' करण्याचा प्रयत्न पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून रोखला.
 आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराभोवती उभारण्यात येणाऱ्या रिंग रोडच्या कामाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

 या रिंग रोडच्या प्रकल्पामुळे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होत आहेत, त्यांच्याकडून प्रशासनाचा निषेध करण्यासाठी थेट प्रांत अधिकाऱ्यांच्या पिंडदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आणि जमिनी वाचवण्यासाठी बाधित शेतकरी नाशिकच्या रामकुंड परिसरात गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत.

रिंग रोडच्या जमिनीची मोजणी सुरू असताना प्रांत अधिकारी पवन दत्ता यांनी आंदोलक शेतकऱ्यांना मारहाण केल्याचा अत्यंत गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला होता.

या प्रकरणात काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला होता.

संजय राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन वादग्रस्त ठरलेले प्रांत अधिकारी पवन दत्ता यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी लेखी तक्रार केली होती.

रामकुंड परिसरातील वाढता तणाव आणि उपोषणामुळे गोदावरी काठावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

एकीकडे सिंहस्थ कुंभमेळ्याची नियोजित कामे वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचा वाढता असंतोष यामुळे नाशिक जिल्हा प्रशासन पुरते कोंडीत सापडले आहे.

पोलिसांनी पिंडदानाचा कार्यक्रम रोखला असला, तरी प्रांत अधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत आणि रिंग रोडचा प्रश्न सुटेपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha