Numerology: कधी कधी माणूस खूप मेहनत करतो. मात्र त्याला मनाप्रमाणे यश मिळत नाही. मग तो नशीबाला दोष देतो. पण उशीर झाला तरी निराश होऊ नये, कारण प्रत्येकाचं नशीब कधी ना कधी फळफळतं आणि मग तो यशाच्या शिखरावर जाऊन पोहचतो.
काहींना यश तरुण वयात मिळतं तर काहींना थोडं उशीरा मिळतं. अंकशास्त्रानुसार, अशा जन्मतारखा आहेत, ज्यांचे नशीब 35-40 नंतर फळफळतं. या लोकांना एकतर भरगच्च पगाराच्या नोकऱ्या मिळतात किंवा ते त्यांच्या स्वत:च्या व्यवसायात खूप यशस्वी होतात.
वयाच्या 40 वर्षांनंतर आयुष्यात अचानक बदल...(Numerology)
अंकशास्त्रानुसार, काही जन्मतारखा अशा आहेत जे करिअरच्या बाबतीत खूप भाग्यवान मानले जातात. या लोकांच्या करिअरमध्ये वयाच्या 40 वर्षांनंतर अचानक बदल होतो. त्यांना सरकारी नोकरी किंवा उच्च पद मिळते, किंवा त्यांचा व्यवसाय नवीन उंची गाठतो. तुमची जन्मतारखेचीही समावेश आहे का? या लोकांना अनेकदा सरकारी किंवा आरामदायी नोकऱ्या मिळतात आणि ते व्यवसायात खूप यशस्वी होतात.
नोकरी आणि करिअरमध्ये उशीराने यशस्वी!
अंकशास्त्रानुसार, सूर्य, बुध आणि शुक्र हे ग्रह थेट संपत्ती आणि करिअरशी संबंधित आहेत. या ग्रहांचा शुभ प्रभाव या लोकांच्या नोकरी आणि व्यवसायात मोठे यश, भरपूर पैसा आणतो. अंकशास्त्रानुसार, अशा जन्मतारखा आहेत, जे या ग्रहांच्या प्रभावामुळे जीवनात खूप यशस्वी ठरतात. कधीकधी, त्यांना वयाच्या 40 वर्षांनंतर अचानक मोठे यश मिळते.
'या' जन्मतारखेच्या लोकांना उशीराने मनासारखी नोकरी मिळते..
अंकशास्त्रानुसार, ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला झाला असेल, त्यांचा मूलांक 1 असतो. 1 अंकाचा स्वामी ग्रह सूर्य आहे, हा यश, राजकारण आणि प्रसिद्धीचा कारक आहे. त्यामुळे या व्यक्तींना राजकारण आणि सरकारी क्षेत्रात मोठे यश मिळते. त्यांना अनेकदा सरकारी नोकऱ्या मिळतात. काही वेळेस, वयाच्या 40 वर्षांनंतर उच्च प्रशासकीय पदेही मिळतात. जर त्यांनी राजकारणात प्रवेश केला, तर ते उच्च पदेही मिळवतात. त्यांना उशीराने मनासारखी नोकरीही मिळू शकते.
'या' जन्मतारखांचे लोक मोठे व्यावसायिक साम्राज्य उभारतात!
अंकशास्त्रानुसार, ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14 आणि 23 तारखेला तारखेला झाला असेल, त्यांचा मूलांक 5 असतो. या लोकांकडे एक व्यावसायिक बुद्धी असते. बुद्धी आणि व्यवसायाचा ग्रह बुध, या व्यक्तींसाठी यशाचा कारक आहे. आपल्या कठोर परिश्रमातून, या व्यक्ती कमी भांडवलात व्यवसाय सुरू करू शकतात आणि नंतर एक मोठे व्यावसायिक साम्राज्य उभारू शकतात.
कोट्यवधीच्या मालमत्तेचे मालक बनतात
अंकशास्त्रानुसार, ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15 आणि 24 तारखेला तारखेला झाला असेल, त्यांचा मूलांक 6 असतो. ते पैशाच्या बाबतीत खूप भाग्यवान असतात. संपत्ती आणि समृद्धीचा ग्रह असलेला शुक्र, अंक 6 चा स्वामी आहे. या लोकांना महागड्या वस्तूंची आवड असते आणि ते आलिशान जीवनशैलीचा आनंद घेतात. हे लोक पैसे कमावण्यासाठी खूप मेहनत करतात आणि त्यांना सुदैवाची देणगी लाभलेली असते. गरीब कुटुंबात जन्मलेले असले तरी, ते वयाच्या 35-40 वर्षांनंतर आलिशान जीवन जगतात.
ही वाचा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Author : एबीपी माझा वेब टीम

