Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
OTT Release This Week: या शुक्रवारी OTT वर धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 5 जबरदस्त फिल्म्स-सिरीज

OTT Release This Week: या शुक्रवारी OTT वर धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 5 जबरदस्त फिल्म्स-सिरीज

ABP माझा 1 week ago

Friday OTT Release: खरंतर वीकेंड जसजसा जवळ येईल तसतसे ओटीटी लव्हर्स मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत असतात. कारण शुक्रवारी थिएटरसोबतच ओटीटीवरही नवे चित्रपट आणि सिरीज रिलीज होतात. या शुक्रवारीही ओटीटीवर मनोरंजनाचा जबरदस्त डोस मिळणार आहे.कॉमेडी, हॉरर, थ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेल्या नव्या फिल्म्स आणि सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

3 जुलै, शुक्रवारी कोणते चित्रपट आणि सिरीज ओटीटीवर येत आहेत, ते जाणून घेऊया.

'प्रीतम अँड पेड्रो'

दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा डिजिटल डेब्यू असलेला 'प्रीतम अँड पेड्रो' हा कॉमेडी-थ्रिलर गोव्याच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या चित्रपटात अर्शद वारसी, विक्रांत मेस्सी, बोमन इराणी आणि मोना सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 3 जुलैपासून जिओ हॉटस्टारवर पाहता येणार आहे.

'मॉलीवुड टाइम्स'

ही मल्याळम सायकोलॉजिकल डार्क कॉमेडी फिल्म विनीत माधवनच्या आयुष्याभोवती फिरते. मोठा हॉरर दिग्दर्शक बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विनीतच्या प्रवासात इंडस्ट्रीतील राजकारण आणि महत्त्वाकांक्षा कशा अडथळा ठरतात, हे यात दाखवण्यात आलं आहे. ही फिल्मही 3 जुलैपासून जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे.

'मुथासी'

केरळ-कर्नाटक सीमेवरील गावाच्या पार्श्वभूमीवर आधारित ही मल्याळम लोक-हॉरर सिरीज आहे. एका कुटुंबावर आलेल्या रहस्यमय संकटाची आणि जुन्या शापाची ही थरारक कथा आहे. ही सिरीज 3 जुलैपासून ZEE5 वर पाहता येईल.

'करक्कम'

मल्याळम सिनेमातील पहिली म्युझिकल हॉरर-कॉमेडी म्हणून ओळखला जाणारा 'करक्कम'दोन तरुणांच्या भन्नाट प्रवासाची कथा आहे. एका चुकीमुळे मुक्त झालेल्या आत्म्यांमुळे गोंधळ उडतो. हा चित्रपट 3 जुलैपासून SonyLIV वर उपलब्ध होणार आहे.

'साइलो सीझन 3'

Silo या लोकप्रिय कादंबरीवर आधारित 'साइलो' या डिस्टोपियन ड्रामाचा तिसरा सीझनही याच शुक्रवारी येत आहे. यात रेबिका फर्ग्यूसन पुन्हा एकदा ज्युलिएट निकोल्सच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सीझन Apple TV+ वर 3 जुलैपासून स्ट्रीम होईल.

ऑगस्ट महिना चित्रपटप्रेमींसाठी खास ठरणार आहे. या महिन्यात एकापेक्षा एक मोठे चित्रपट प्रदर्शित होणार असून बॉक्स ऑफिसवर मोठे क्लॅश पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला सनी देओल आणि इमरान हाश्मी यांची टक्कर होणार आहे, तर दुसरीकडे श्रद्धा कपूर आणि यश यांच्यातही स्पर्धा रंगणार आहे. चला जाणून घेऊया, ऑगस्ट महिन्यात थिएटरमध्ये कोणते चित्रपट रिलीज होणार आहेत.

Author : एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha