Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
OTT webseries: एकदा पाहायला सुरुवात केली की थांबणार नाही! स्कॅम, फ्रॉड आणि थराराने भरलेल्या 'या' 3 OTT वेब सीरिज पाहाच

OTT webseries: एकदा पाहायला सुरुवात केली की थांबणार नाही! स्कॅम, फ्रॉड आणि थराराने भरलेल्या 'या' 3 OTT वेब सीरिज पाहाच

ABP माझा 1 week ago

OTT Scam Thriller: स्कॅम, फसवणूक आणि धक्कादायक सत्यावर आधारित वेब सीरिज पाहायला अनेकांना आवडतात. अशा कथा केवळ मनोरंजनच करत नाहीत, तर आपल्या आसपास घडणाऱ्या आर्थिक गुन्ह्यांचीही जाणीव करून देतात.

भारतीय OTT वर अशा अनेक दमदार वेब सीरिज उपलब्ध आहेत, ज्या प्रेक्षकांना स्कॅमच्या अंधाऱ्या जगात घेऊन जातात. नुकतीच चर्चेत आलेली 'द पिरॅमिड स्कीम' असो किंवा 'जामताडा : सबका नंबर आएगा', या आठवड्यात बिंज-वॉच करण्यासाठी या वेब सीरिज नक्की पाहू शकता.

1. द पिरॅमिड स्कीम

'द पिरॅमिड स्कीम' ही वेब सीरिज झटपट श्रीमंत होण्याच्या मोहाची भीषण किंमत कशी चुकवावी लागते याचं उत्तम उदाहरण आहे. गोल्डी नावाचा एक तरुण आर्थिक अडचणींमुळे MLM (मल्टी-लेव्हल मार्केटिंग) स्कॅमच्या जाळ्यात अडकतो. पैशांच्या लालसेत सुरू झालेला त्याचा प्रवास पुढे मोठ्या संकटात बदलतो आणि त्याचा फटका त्याच्या कुटुंबासह अनेकांना बसतो. या मालिकेत शेखर सुमन, रणवीर शौरी, परमवीर सिंह चीमा, आशीष राघव, अंजन श्रीवास्तव आणि अल्फिया जाफरी यांच्या भूमिका आहेत.

कुठे पाहाल?

OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून आजकाल गुंतवणुकीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशा स्कॅमचं वास्तव समजून घेण्यासाठी ही मालिका उपयुक्त ठरू शकते.

2. बॅड बॉय बिलेनियर्स: इंडिया

'बॅड बॉय बिलियनेअर्स : इंडिया' ही एक माहितीपट (डॉक्यु-सीरिज) आहे. भारतातील काही गाजलेल्या उद्योगपतींच्या यशापासून ते त्यांच्या घसरणीपर्यंतचा प्रवास या मालिकेत दाखवण्यात आला आहे. खऱ्या आर्काइव्ह फुटेज आणि मुलाखतींच्या माध्यमातून लालसा, आर्थिक फसवणूक आणि भ्रष्टाचाराची कहाणी यात उलगडली जाते.

कुठे पाहाल?

ही डॉक्यु-सीरिज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.देशातील मोठमोठ्या आर्थिक घोटाळ्यांमागील सत्य आणि त्यामध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींच्या कहाण्या जाणून घेण्यासाठी ही मालिका पाहण्यासारखी आहे.

3. जामताडा : सबका नंबर आएगा

'जामताडा : सबका नंबर आएगा' ही दोन सीझनची लोकप्रिय क्राइम थ्रिलर आहे. तांत्रिक ज्ञान असलेले काही शाळा सोडलेले तरुण एका छोट्याशा गावातून फिशिंग स्कॅम चालवतात. जसजसा हा घोटाळा वाढत जातो, तसतसे भ्रष्ट अधिकारी आणि राजकीय हस्तक्षेप यामुळे संपूर्ण प्रकरण आणखी गुंतागुंतीचं होतं.

कुठे पाहाल?

ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.फोन कॉल, OTP आणि ऑनलाइन फसवणुकीचे वाढते प्रकार कसे घडतात, यामागचं वास्तव जाणून घ्यायचं असेल तर ही मालिका नक्की पाहा.

Author : abp majha web team

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha