Dailyhunt
OTT Webseries: ऑनस्क्रीन बायकोवर अत्याचाराचा 'तो' भयाण सीन; शुटिंग संपताच थरथर कापत होता अभिनेता; OTT वर धुमाकुळ घालतेय 'ही' वेबसिरीज

OTT Webseries: ऑनस्क्रीन बायकोवर अत्याचाराचा 'तो' भयाण सीन; शुटिंग संपताच थरथर कापत होता अभिनेता; OTT वर धुमाकुळ घालतेय 'ही' वेबसिरीज

ABP माझा 1 week ago

OTT webseries: सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक गंभीर आणि चौकटीच्या बाहेरच्या विषयांवर भाष्य करणाऱ्या सिरीज, शॉर्ट फिल्म येताना दिसत आहेत. नुकतीच JioHotstar वर प्रदर्शित झालेली ' चिरैया' ही सीरिज सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे.

गंभीर विषयावर आधारित असलेल्या या सीरिजमध्ये मॅरिटल रेपसारख्या संवेदनशील मुद्द्याला हात घालण्यात आला आहे. फक्त 6 भागांची असलेली ही सिरीज OTT वर धुमाकुळ घालतेय. या सिरीजमधील अरुण आणि पूजा यांच्या वेडिंग नाईट सीनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या सीरिजमध्ये अरुणची भूमिका सिद्धार्थ शॉ (Siddharth Shaw) या कलाकाराने साकारली आहे. तर पूजा या भूमिकेत प्रसन्न बिष्त (Prasanna Bisht) झळकली आहे. या दोघांचा वेडिंग नाईट सीन अतिशय भावनिक आणि अस्वस्थ करणारा ठरला. आता या सीनच्या शूटिंगदरम्यानचा अनुभव दोघांनीही शेअर केला आहे.

'त्या' सीननंतर अभिनेता थरथर कापायला लागला ...

अभिनेत्री प्रसन्ना बिष्टने एका मुलाखतीत सांगितले की, 'हा सीन अजिबात सोपा नव्हता. सेटवर इंटिमसी कोऑर्डिनेटर होते आणि त्यांनी सीन कसा करायचा हे व्यवस्थित समजावून सांगितले होते. मात्र, पहिल्याच टेकवेळी सिद्धार्थ अचानक रडायला लागला. तो थरथरत होता, त्यामुळे आम्हाला शूट थांबवून त्याला सावरायला वेळ द्यावा लागला.'

यावर सिद्धार्थ शॉनेही प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, 'मला कळलंच नाही मी का रडलो. कदाचित एक माणूस म्हणून त्या सीनचा भावनिक परिणाम माझ्यावर झाला असावा. आम्ही शूटपूर्वी रिहर्सलही केली होती, पण तरीही पहिली प्रतिक्रिया रडण्याचीच आली.'

चिरैया वेब सिरीज ट्रेंडिंगमध्ये कायम

दरम्यान, 20 मार्च 2026 रोजी प्रदर्शित झालेली 'चिरैया' ही सीरिज रिलीज झाल्यानंतरही ट्रेंडिंगमध्ये कायम आहे. प्रेक्षकांनी तिच्या कथानकासह कलाकारांच्या अभिनयालाही जोरदार प्रतिसाद दिला आहे. या सिरीज ने अशा विषयाला हात घातलाय ज्यावर बोलायलाही लोक कचरतात. 'मॅरिटल रेप ' या विषयाभोवती फिरणारी ही वेब सिरीज सध्या चर्चेचा विषय ठरतेय. तुम्हाला ही सिरीज जिओ हॉटस्टारवर पाहता येईल . एकूण सहा एपिसोडच्या या सिरीज मध्ये सिद्धार्थ आणि प्रसन्न यांनी मुख्य भूमिका साकारले आहेत. प्रदर्शनाच्या 14 दिवसानंतरही ही सिरीज ओटीटीवर ट्रेंडिंगमध्ये आहे.

Author : जयदीप मेढे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha