Dailyhunt
Pandharpur Crime News: अर्धांगवायू झालेल्या महिलेवर अत्याचार, आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेप, पंढरपूर न्यायालयात मोठा निर्णय

Pandharpur Crime News: अर्धांगवायू झालेल्या महिलेवर अत्याचार, आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेप, पंढरपूर न्यायालयात मोठा निर्णय

ABP माझा 1 week ago

Pandharpur Crime News: पंढरपूर शहरामध्ये 2013 साली अर्धांगवायू झालेल्या पीडित विधवा महिलेवर बलात्कार (Pandharpur Crime) करणाऱ्या आरोपी शेख मुख्तार बेद्रेकर यास नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे . तसेच 5 वर्षे सक्त मजुरी आणि 65 हजार रुपये दंडाची शिक्षा देखील पंढरपूरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावली आहे.

या निकालामुळे बेद्रेकर सारख्या विकृत आरोपीला न्यायालयाने योग्य शिक्षा दिल्याच्या प्रतिक्रिया येऊ लागले आहे. Pandharpur Crime News

दरम्यान, याप्रकरणी सरकारी पक्षाकडून सात साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. यातूनच आरोपी बेद्रेकर यास नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली आहे. पंढरपूर शहरात बेद्रेकरने केलेल्या बलात्काराची घटना मोठी चर्चेला होती. याच प्रकरणावर आता न्यायालयाने निकाल दिला आहे.

धक्कादायक! पंढरपूरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी, कुटुंबाच्या दाव्यानुसार उष्माघाताने झाला तरुणाचा मृत्यू

राज्यात उष्णतेची तीव्र लाट असताना पंढरपूरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. पंढरपुरातील एका 24 वर्षीय तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांकडून करण्यात आलेला आहे. पंढरपूरमधील दिनेश प्रकाश देशमुख हा 24 वर्षांचा तरुण उन्हातूनघरी आल्यानंतर आजारी पडला. घरी दुपारी साडेतीन ते चार वाजताच्यादरम्यान त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि यातच त्याचा प्राण गेल्याचेसमोरआलंय. दिनेश देशमुख रहात असलेले घर हे पूर्ण पत्र्याचे असून यातच दुपारच्या उन्हाचाअतिजास्त त्रास झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.

सध्या पंढरपूरमध्ये तापमान 41 डिग्रीपासून थेट 43 ते 44 डिग्रीपर्यंत वाढत आहे. यामुळे सकाळी दहा वाजल्यापासून अक्षरशः शरीराची लाहीलाही होत आहे. अशातच काल अशाच उष्णतेत एक चारचाकी कार जळून भस्मसात झाली होती. आता दिनू देशमुख या 24 वर्षे तरुणाचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा दावा कुटुंबाने केल्यानंतर आता प्रशासनाने सुरक्षेसाठी सूचना आणि उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे.

इतरमहत्वाच्याबातम्या

Author : सुनील दिवाण, एबीपी माझा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha