Dailyhunt
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता

Personal Loan : वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता

ABP माझा 3 weeks ago

Personal Loan मुंबई : अनेक कारणांमुळं आर्थिक गरजांसाठी वैयक्तिक कर्ज काढावं लागावं लागतं. वाहन कर्ज, गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज यामधून त्या कारणासाठी कर्ज मिळतं. आर्थिक अडचणीच्या काळात वैयक्तिक कर्ज काढलं जातं.

मात्र, अनेकदा वैयक्तिक कर्ज काढताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास किंवा चुका केल्यास आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळं वैयक्तिक कर्ज काढताना काही गोष्टींची सतर्कता पाळणं आवश्यक आहे.

वैयक्तिक कर्ज हे विनातारण कर्ज असतं. हे कर्ज बँक किंवा वित्तीय संस्थेकडून मिळतं. वैयक्तिक कर्ज छोट्या रकमेचं असतं. लग्न, वैद्यकीय संकट किंवा घराची दुरुस्ती या कारणासाठी काढलं जातं. हे कर्ज घेताना तुम्हाला काही तारण ठेवावं लागत नाही. तुम्हाला सोप्या प्रक्रियेद्वारे कर्ज मिळतं. मात्र, वैयक्तिक कर्जाचा व्याज दर अधिक असतो.

वैयक्तिक कर्ज काढताना कोणती काळजी घ्यावी?

वैयक्तिक कर्ज काढण्याची प्रक्रिया खूप सोपी असते. कागदपत्र जमा करावी लागत नाहीत, किंवा बँकेत जावं लागत नाही. अलीकडच्या काळात ऑनलाइन पद्धतीनं किंवा मोबाइल अॅपद्वारे देखील वैयक्तिक कर्ज मिळते. मात्र, वैयक्तिक कर्ज काढताना सतर्कता पाळावी लागते.

व्याजदराची तुलना (Interest Rate)

वैयक्तिक कर्ज काढताना तुम्हाला विविध बँकांच्या व्याज दराची तुलना केली पाहिजे. कोणती बँक कमी व्याज दरानं कर्ज देते हे तपासलं पाहिजे. कमी व्याज दरानं कर्ज घेतल्यास ते फायदेशीर ठरु शकतं.

क्रेडिट स्कोअर (Credit Score)

वैयक्तिक कर्ज काढताना सर्वात महत्त्वाचा भाग क्रेडिट स्कोअर असतो. जर तुमचा क्रेडिट स्कोअर 750 हून अधिक असतो त्यावेळी कमी व्याज दरावर कर्ज मिळते. जर, तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असेल तर जास्त व्याज दरानं कर्ज काढावं लागेल.

छुपे शुल्क ओळखा (Hidden Charges)

वैयक्तिक कर्ज काढताना तुम्हाला छुप्या शुल्कावर लक्ष ठेवावं लागेल. काही संस्था किंवा बँका हिडन चार्जेसच्या नावावार प्रोसेसिंग फी, प्रशासकीय शुल्क आणि प्री-पेमेंट चार्चेस बाबत अगोदर माहिती घेणे आवश्यक आहे.

EMI निश्चिती (EMI Scheduling)

वैयक्तिक कर्ज घेताना तुम्ही तुमच्या कर्जाचा हप्ता पगाराच्या 40 टक्क्यापेक्षा कमी असणं आवश्यक आहे. तुम्हाला जर अधिक ईएमआय द्यावा लागत असेल तर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

कर्ज कालावधी(Loan Tenure)

तुम्ही जर एखादं कर्ज काढणार असाल तर कर्जाचा कालावधी कमी ठेवा. तुम्ही जास्त काळासाठी कर्ज घेतलं तर तुम्हाला अधिक व्याज द्यावं लागेल. तुमच्या कर्जाचा कमाल कालावधी 5 वर्ष असावा. त्यापेक्षा अधिक कालावधीचं कर्ज घेतल्यास अधिक व्याज द्यावं लागेल.

आवश्यक कागदपत्रे (Important Documents)

वैयक्तिक कर्ज घेताना अधिक कागदपत्रं द्यावी लागत नाहीत. मात्र, काहीवेळा तुम्हाला तुमचा पत्ता, नोकरी या ठिकाणची कागदपत्रं तयार ठेवावी लागतील. काही कागदपत्र नसतील तर बँकेसोबत चर्चा करावी.यामुळं प्रत्यक्ष कर्ज घेताना अडचणी येणार नाहीत.

फेक अॅपपासून सावध (Fake Apps)

सध्या डिजीटल युग आहे. यामुळं काही प्लॅटफॉर्मवरुन घरबसल्या कर्ज दिलं जातं, तुम्ही मात्र या जाळ्यात अडकण्यापासून वाचलं पाहिजे. काही अॅप इतके छुपे शुल्क आकारतात की तुम्हाला कर्ज वाढत जातंय हे लक्षात येत नाही. त्यामुळं बँकांच्या विश्वसनीय अॅपवरुन कर्ज काढावं.

Author : जगदीश ढोले

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha