Pooja Birari Brother Soham Meet: पूजा बिरारी (Pooja Birari) आणि सोहम बांदेकर (Soham Bandekar) यांच्या लग्नाची प्रचंड चर्चा झाली. पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर हे लोकप्रिय सेलिब्रिटी कपलपैकी एक आहेत.
काही महिन्यांपूर्वी (Entertainment) त्यांचं लग्न झालं. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो व्हायरल झाले. अनेक मुलाखतीत पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर यांनी आपल्या लव्हस्टोरीबद्दल सांगितलं. त्यांची लव्हस्टोरी ही काहीशी हटके आहे. पूजा आणि सोहम यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी, पूजाच्या घरच्यांची नेमकी काय रिअॅक्शन होती? आई - वडील आणि भावाने नेमकं काय सांगितलं? सोहमला भेटण्यासाठी तिच्या भावाने त्याच्याशी संपर्क केल्यानंतर, भावाची नेमकी काय रिअॅक्शन होती? याबद्दल नुकतंच पूजाने आपल्या मुलाखतीत सांगितलं.
पूजा बिरारी आणि सोहम यांच्या लग्नाची बरीच चर्चा झाली (Pooja Birari reveals brothers reaction to Soham Bandekar)
पूजा आणि त्याच्या भावामधील बॉण्ड खूप घट्ट आहे. तुषार बिरारी असं पूजाच्या भावाचे नाव आहे. तो जर्मनीत असतो. लग्न करण्यापूर्वी सोहमला जाणून घेण्यासाठी पूजाच्या लग्नाची जबाबदारी पूजाच्या वडिलांनी तिच्या भावावर सोपवली होती. पूजाने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत अभिनेत्रीने तुषार बिरारी आणि सोहम यांच्याबद्दल सांगितलं. लग्नपूर्वीच्या किस्स्यांबद्दल सांगताना पूजा म्हणाली, 'आधी मी घरी सोहमबद्दल सांगितलं. दादा पण गणपतीत घरी आला होता. त्या काळात मी सोहमबद्दल घरी सांगितलं होतं', असं पुजा म्हणाली.
'सर्वांनाच सोहमबद्दल घरी समजल्यानंतर बाबांनी माझ्या भावावरच सगळी जबाबदारी सोपवली होती. सोहमबद्दल जाणून घेण्यासाठी सोहम आणि दादाची भेट झाली. वडील म्हणाले होते की, मुलाला कॉफीसाठी वगैरे जाऊन भेट. मी देखील सोहमला याबद्दल सांगितलं. त्याला म्हटलं की, दादाला तुला भेटायचं आहे, असं सांगितलं. मग तेव्हा सोहम म्हणाला की, कॉफीसाठी वगैरे कशाला आपण घरीच भेटू. मग भेट झाल्यानंतर दादा म्हणाला की, छान आहे सगळं. त्याने पुढे जाण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला'.
केवळ सोहमबाबत निर्णय घेताना नाही, पूजा बिरारीच्या दादाने तिची प्रत्येकवेळी साथ दिली. पूजा जेव्हा मालिकांसाठी ऑडिशन देत होती, तेव्हा दादा हा तिच्याबरोबरच होता, असं अभिनेत्रीने सांगितलं.
इतर बातम्या:
Author : भाग्यश्री कांबळे

