अभिनेत्री प्राजक्ता माळी अभिनेत्री म्हणून सगळ्यांना माहित आहेच. पण ती आता उद्योजिकाही आहे. 'माझा महाराष्ट्र माझा व्हिजन' या Abp माझाच्या कार्यक्रमात तिने तिच्या उद्योजिका म्हणून असणाऱ्या प्रवासाविषयी मोकळेपणाने बातचीत केली.
यावेळी बोलताना तिने शंभर वर्ष जुन्या दागिन्यांची काही नावं सांगितली . तुम्हाला माहिती आहेत का हे दागिने ?
वज्रटीक नावाचा दागिना कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या गळ्यात असतो . बारीक बारीक मुलांची सुंदर गुंफण या दागिन्यात दिसते .
पुतळी हार तुळजाभवानीच्या गळ्यात साजरा दिसतो. गोल सोन्याच्या चपट्यांची ही माळ अंबाबाईच्या गळ्यात अनेकांनी पाहिली असेल.
एकदाणी ही नावाप्रमाणेच तांदळाच्या एका दाण्यासारखी दिसते. बोरमाळेसारखी याची साखळी अनेकींना भुरळ घालतेय.
बकुळीहार हा असाच एक सुंदर दागिना आहे. बकुळीच्या फुलांपासून प्रेरणा घेऊन या फुलांची सुंदर गुंफण केली जाते.
जोंधळेमणी गुंड हा दागिना नावाप्रमाणेच जोंधळ्याच्या दाण्यांसारखी सोन्याच्या मण्याची केलेली घडणावळ आहे. आणि मागे जोडलेला गुंड हा शब्द या दागिन्यात येणाऱ्या मोठ्या मण्यासाठी वापरतात.
नमस्कार तोडे अन् शिंदेशाही तोड्यांचा एक वेगळाच साज आहे.
गजरी पैंजण
पारंपरिक दागिन्यांमध्ये आणखी एक प्रकार विसरता येत नाही तो म्हणजे नथ. मयूर नथ हा मोराला केंद्रस्थानी ठेऊन केलेली नथ आजकाल अनेकजणी वापरतात.
यात कोल्हापुरी नथ आणि मराठा नथ यातील फरक लगेच दिसून येण्यासारखा आहे. दोन्ही नथिंगचा पारंपरिक लेहजा वेगळाय .

