Prajakta Mali on ABP Majha Vision: अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही कायम तिच्या अभिनयासह तिच्या वैयक्तिक आयुष्यावरुनाही कायम चर्चेत असते. तिने अलीकडेच तिचा मराठमोळ्या दागिन्यांचा brand सुरु केलाय.
सध्या 'स्टार्ट अप इंडिया' चं बाळसं धरलेलं असताना फेल होणाऱ्या स्टार्टअपचा भारतातील आकडाही 90 टक्के आहे. पण एकीकडे उत्तम अभिनेत्री, नव्यानेच निर्माती म्हणून पुढे जात असताना दुसरा व्यवसाय सुरु करण्याचा विचार अभिनेत्री प्राजक्ता माळीने का केला? याचं कारण तिने 'ABP माझा' च्या 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' मध्ये सांगितलंय.
काय म्हणाली प्राजक्ता माळी?
प्राजक्ता म्हणाली, "महाराष्ट्राशी नाळ जोडलेला असा हा ब्रँड आहे, जेवढे आपले मराठी दागिने आणि अलंकार काळाच्या पडद्याआड गेलेत, ते पुन्हा पुनर्जित करण्यासाठीच या ब्रँडची स्थापना झाली आहे. कारण दागिने, मराठी दागिने आणि 100 वर्ष किंवा त्याहून दागिने आपल्या ब्रँडमध्ये सहभागी केले आहेत. मला दोन-तीन गोष्टी कारणीभूत ठरल्या ब्रँड सुरू करण्यासाठी... अभिनेत्री म्हणून प्रवास सुरू असताना मला असं वाटलं की, या क्षेत्रात मी आहे, हेच मूळात कारण आहे... अभिनेत्रीचं आयुष्य एवढं परावलंबी आहे, इतकी आर्थिक अरसुरक्षितता आहे, वाचनामुळेही मला सतत लक्षात आलं की, उतरत्या काळात झालेली कलाकारांची अवस्था, कारण त्यांनी अजिबात आर्थिक मॅनेजमेंट केलं नाही, सेविंग्स केल्या नाहीत... मग मध्येच कोरोना येऊन गेला... मनोरंजन सुरू व्हायला सगळ्यात उशीर झाला हेच फॅक्टर्स मला ट्रिगर होत गेले की, काहीतरी करावं लागेल, यावर अवलंबून राहू शकत नाही..." असं ती म्हणाली.
तिने पुढे सांगितलं,"आपल्याला जर स्वतंत्र आणि स्वाभिमानी व्यक्ती म्हणून जगायचंय आणि त्यासोबत कलाकार आणि स्त्री म्हणून जगायचं तर आर्थिकरित्या स्वावलंबी असायलाच हवं... मी ऐतिहासिक पुस्तकं खूप वाचलीत... त्यामुळे मी खूपच मराठी झालीय... महाराष्ट्राशी माझी नाळ घट्ट जोडली गेली. इतिहासात मी खूप रमते आणि खूपच रिलेट करते... त्याचाही परिणाम मी ब्रँड सुरू करण्यामागे आहे..."
शंभर वर्ष जुन्या दागिन्यांची नावंही सांगितली
प्राजक्ता म्हणाली, " माझ्या चुलत भावाचं लग्न होतं आणि मला अगदी अस्सल मराठी दागिना हवा होता... पण मला तो कुठेच मिळाला नाही इमिटेशन फॉर्ममध्ये... कारण आपले सगळे मराठी दागिने हातावर घडवले जातात... कुठेच मशीनमेड नाहीय, त्यामुळे जे बनलं जातं, ते फक्त सोन्यात बनलं जातं... कुणी नबवतंच नाही, तर कसं मिळणार... त्यासाठी कारागिरच मिळत नव्हते... मग मला जाणवलं की, इथेच गॅप आहे...

