Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 765 अग्निवीरांचा शामदार दीक्षांत समारंभ

प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 765 अग्निवीरांचा शामदार दीक्षांत समारंभ

ABP माझा 3 weeks ago

 प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 765 अग्निवीर जवानांचा शामदार दीक्षांत समारंभ मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे पार पडला.
 दीक्षांत समारंभाला मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडीयर गिरीश उपाध्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे अग्निवीर जवानांनी खडतर असे चोवीस आठवड्याचे प्रशिक्षण पूर्ण केले.

तिरंगा ध्वज आणि रेजिमेंटच्या ध्वजाच्या साक्षीने अग्निवीर जवानांनी देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च त्याग करण्याची शपथ घेतली.

यावेळी अग्निवीर जवानांनी शानदार संचलन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली.

परेडचे नेतृत्व अग्निवीर संकेत सिंग याने मेजर गजानन पाटील यांच्या नेतृत्वाखाली केले.

प्रशिक्षण कालावधीत उत्तम कामागिरी बजावल्या बद्दल अग्निवीर जवान उत्तम घोलप याला सर्वोत्कृष्ट अग्निवीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

दीक्षांत समारंभाला वरिष्ठ लष्करी अधिकारी, निमंत्रित, अग्निवीर जवानांचे कुटुंबीय उपस्थित होते.

युद्ध स्मारक येथे आदरांजली अर्पण करून दीक्षांत समारंभाची सांगता झाली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha