Pravin Tarde On Pune Narsapur Case:पुणे (Pune News) जिल्ह्यातील नरसापूर (Pune Narsapur Case) इथे घडलेल्या घटनेनं अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. चार वर्षांच्या चिमुकलीवर 65 वर्षांच्या नराधमानं अत्याचार करून निर्दयीपणे तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra Narsapur Case) संतापाची तीव्र लाट उसळली. सर्व स्तरांतून निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच, आरोपीला शिक्षा वैगरे नाही, थेट फाशी द्या, अशा मागणीनं जोर धरला आहे. अनेक कलाकारांनीही या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. आरोपीला तात्काळ कठोर शिक्षा देण्याची मागणी सगळीकडून होत असतानाच, मराठी अभिनेते (Actor, Director Pravin Tarde) आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनीही याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया देत अशा नराधमांचा एन्काऊंटर करण्याची मागणी केली आहे. तसेच, सरकारला कडक शब्दांत इशाराही दिला आहे.
प्रवीण तरडे इन्स्टा पोस्टमध्ये काय म्हणालेत? (Pravin Tarde On Nasrapur Case)
प्रवीण तरडेंनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन या प्रकरणाबाबत पोस्ट शेअर केली आहे. "उद्या त्या नराधामाचे एन्काऊंटर झाले तरच मानू की, हे सरकार शिवाजी महाराजांच्या विचारांचे आहे. अन्यथा भोर-वेल्हा-मुळशीच्या मावळ्यांनी कायदा हातात घ्यावा", असं म्हणत प्रवीण तरडेंनी पोस्टमधून संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्याच्या नरसापूरमध्ये नेमकं काय घडलं? (Nasrapur Girl Death)
पुण्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली. 65 वर्षीय नराधमानं घरासमोर खेळत असलेल्या एका चिमुकलीला गोठ्यात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा राक्षस एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यानं चिमुकलीची दगडानं ठेचून निर्घृण हत्या केली आणि मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला. दुपारपर्यंत मुलगी कुठेच दिसत नसल्यानं कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर परिसरातील CCTV फुटेज तपासल्यानंतर आरोपी चिमुकलीला गोठ्याकडे घेऊन जाताना दिसला. त्यानंतर नसरापूर ग्रामस्थांनी आरोपीचा शोध घेतला आणि बनेश्वर फाट्यावरून पकडून आणून चोप दिला. चोप मिळताच आरोपीने मुलीचा मृतदेह लपवून ठेवलेली जागा सांगितली. आरोपीने "वासरू दाखवतो..." असं सांगून तिचा हात धरत तिला गोठ्यात नेलं आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला.
नराधमाला 5 दिवसांची कोठडी
इतकं गंभीर कृत्य करूनही या नराधमाला त्याचा जराही पश्चाताप झालेला नाही. ग्रामस्थांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं. तरीही आपण काहीही चुकीचं केलेलं नाही, असा दावा या नराधमाने कोर्टात केला. शनिवारी पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलं. यावेळी युक्तिवादही नराधमाच्या समोरच झाला. मग न्यायाधीशांनी या नराधमाला प्रश्न विचारला, तुमची केस नेमकी काय आहे माहिती आहे का? त्यावर या नराधमानं अक्षरश: संताप येईल, असं उत्तर दिलं. ही मारामारीची किरकोळ केस आहे, असं हा राक्षस कोर्टात म्हणाला. या प्रकरणातील नराधमाला कोर्टानं 5 दिवसांची कोठडी सुनावणी आहे. मात्र, या नराधमानं केलंलं हे पहिलं नाहीतर तिसरं कृत्य आहे. याआधी पुरावं नसल्यानं तो दोन वेळा निर्दोष सुटलाय. त्यामुळे किमान या प्रकरणात तरी त्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी प्रतिक्रिया सर्वच स्तरातून उमटत आहेत.
Author : एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क

