Priya Bapat Photos: अभिनेत्री प्रिया बापट सध्या उमेश कामतसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
चित्रपट, नाटक, वेब सिरीज अशा अनेक माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी ही लाडकी जोडी सध्या मालदीवला गेलीय.
निळाशार समुद्र,स्वच्छ आकाश आणि मालदीव्सच्या निसर्गात दोघेही मनमुराद आनंद लुटत आहेत.
त्या दोघांच्या फोटोजवर प्रेक्षक, चाहते लाईक्स, कमेंटचा वर्षाव करत आहेत.
विशेषतः प्रियाच्या हॉट लूकने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
प्रियाच्या प्रत्येक लुकने प्रेक्षकांना थक्क केलंय. प्रिया आणि उमेशने ट्वीनिंगही केलं आहे.
तिच्या मालदीव्समधील बीच व्हेकेशनचा ग्लॅमरस आणि सिजलिंग लुक, ज्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
प्रिया बापट तिच्या अभिनयासोबतच तिच्या फॅशन सेन्स आणि स्टाइलसाठीही ओळखली जाते
प्रिया बापटच्या वर्कफ्रंटबाबतही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. तिच्या आगामी प्रोजेक्ट्सची अधिकृत घोषणा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मी आयुष्यभर एक डोंगरकन्या राहिले आहे. बीचेस कधी मला फारसे आकर्षित करत नव्हते… पण या प्रवासाने माझा दृष्टिकोनच बदलून टाकला. आता मी समुद्राच्या प्रेमात पडले आहे. असं प्रियाने पोस्टवर म्हटले आहे.
त्याची शांतता, त्याची उग्रता… मला त्याच्याशी खूपच जोडल्यासारखं वाटतं.वरून तो कितीही आनंदी, चंचल आणि उत्साही वाटत असला, तरी आत खोलवर तो किती शांत असतो… आणि स्वतःमध्ये किती रहस्यं आणि खजिने दडवून ठेवतो.
कधी कधी आपल्याला फक्त त्याची उग्र बाजूच दिसते.वारा आणि लाटांनी तयार झालेली अस्थिरता…
पण जेव्हा आपण आत खोलवर जातो, तेव्हा समजतं की तो किती सुंदर आहे आणि त्याच्या आत किती काही दडलेलं आहे… असं तिने लिहिलं.

