Priya Bapat Natak Jar Tar Chi Goshta: प्रिया बापट (Priya Bapat) हिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. प्रिया बापट, उमेश कामत, पल्लवी पाटील आणि आशुतोष गोखले या चौघांचा 'जर तरची गोष्ट' (Jar Tarchi Gosht) हे नाटक प्रचंड गाजलं.
नाटकाचे अनेक छोटे व्हिडीओ, रिल्स सोशल मीडियात व्हायरल होतात. या नाटकाची विशेष चर्चा सुरू आहे. पहिल्या दिवसापासून नाटकाबाहेर 'हाऊसफुल्ल'ची (Housefull) पाटी लागली आहे. विशेष म्हणजे या नाटकाचे 400 भाग पूर्ण झाले आहेत. या कलाकारांनी अलिकडेच (Natak) मुलाखतीत भन्नाट किस्से शेअर केले आहेत. प्रिया बापटने या मुलाखतीत नाटकातील एक भन्नाट किस्सा शेअर केला आहे. नाटक सादर करत असताना नेमकं काय घडलं? वाक्य विसरल्यामुळे कलाकारांची कशी धांदल उडाली? हा किस्सा अभिनेत्रीने मुलाखतीत शेअर केला. तो भन्नाट किस्सा कोणता? जाणून घेऊयात.
'जर तरची गोष्ट' या नाटकादरम्यान घडलेला भन्नाट किस्सा (Priya Bapat Reveals Incident From Natak Jar Tar Chi Goshta)
'जर तरची गोष्ट' या नाटकादरम्यानचा किस्सा अभिनेत्री प्रिया बापट हिने शेअर केला. एक वाक्य विसरल्यामुळे कशी धांदल उडते? प्रयोग थांबला होता की, सुरु होता? याबद्दल अभिनेत्री म्हणाली, 'नाटकादरम्यान मी माझं वाक्य दोनवेळा म्हणाले. जेणेकरुन समोरच्या व्यक्तीला त्याचं लीड मिळेल. यावेळी पल्लवी बोलता बोलता वाक्य विसरली. तेव्हा ती शांतपणे मला चेहऱ्याने खुणावत होती. मी वाक्य रिपिट केलं. पण तरीही ती खुणावत होती. तेव्हा मलाही कळेना की नेमकं काय करायचं?'.
'त्या पॉइंटला मी पूर्णपणे ब्लँक झाले. मी इतकी ब्लँक झाले होते की, नाटकात नेमकं काय सुरुये, हेच मला कळत नव्हतं. मी शस्त्र टाकली, तिने देखील शस्त्र टाकली. प्रयोग थांबवला. मी लाईट दादांना विचारलं की, मी काय वाक्य बोलले सांगा जरा', असं प्रिया बापट म्हणाली. यावेळी आशुतोष गोखले म्हणाले की, 'आधी प्रियाने प्रेक्षकांची माफी मागितली. सॉरी आम्ही वाक्य विसरलो आहे, असं म्हणत तिने प्रेक्षकांची माफी मागितली'.
यानंतर प्रिया बापट म्हणाली की, 'प्रेक्षक हसायला लागले. मी देखील हसायला लागले. कारण त्या प्रसंगी काहीच सुचणं शक्य नव्हतं. माझं झालेलं आधीचं वाक्य मला प्रेक्षकांनी सांगितलं. मी नंतर आशुतोषला शोधलं. आशुतोषने वाक्य दिलं. पण ते वाक्य पल्लवीला ऐकायलाच आलं नाही. ते वाक्य मला ऐकायला आलं. मी ते पल्लवीचं वाक्य म्हटलं आणि मी तिला सांगितलं की इथून तू पिकअप कर. मग तिने पिकअप केलं, मग प्रयोग सुरु झाला', असं अभिनेत्री म्हणाली.
इतर बातम्या:
Author : भाग्यश्री कांबळे

