Dailyhunt
पुढची 25 वर्षे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री; जैन मुनींच्या वक्तव्यावरुन नितेश राणेंची नाराजी, शिवरायांबद्दलही बोलले

पुढची 25 वर्षे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री; जैन मुनींच्या वक्तव्यावरुन नितेश राणेंची नाराजी, शिवरायांबद्दलही बोलले

ABP माझा 1 week ago

सिंधुदुर्ग: आपल्या वादग्रस्त आणि कट्टर हिंदुत्त्वावादी वक्तव्याने नेहमीच चर्चेत असलेल्या मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांच्याबाबत जैन मुनी निलेशचंद्र यांनी भाकीत केलं आहे. मुनी निलेशचंद्र यांनी राणेंचे तोंडभरुन कौतुक करताना चक्क छत्रपती शिवाजी महाराजांची (Shivaji Maharaj) उपमान त्यांना दिली.

तसेच, नितेश राणे यांनी केवळ मंत्रीच नाही, तर राज्याचे मुख्यमंत्री (CM) व्हायला हवे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. नितेश राणेंची भूमिका ही दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखीच आक्रमक आहे. मालेगाव किंवा मालवणमध्ये जेव्हा जातीय तणाव निर्माण झाला, तेव्हा नितेश राणे तिथे सर्वात आधी पोहोचले, असे सांगत त्यांनी राणेंचे अभिनंदन केले. तसेच, "नितेश राणे यांची उंची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखीच आहे," असेही मुनींनी म्हटले होते. आता, मुनींच्या या वक्तव्यावर नितेश राणेंनी भूमिका मांडली.

छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही. त्यामुळे कोणी आपली भावना व्यक्त केली असेल तर ते आम्हाला मान्य नाही, असे म्हणत मंत्री नितेश राणे यांनी जैन मुनी निलेशचंद्र यांनी केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. तसेच, राज्याला कर्तबगार मुख्यमंत्री लाभले असून पुढचे 25 वर्ष देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे, त्यांच्या भावनेवर मी सभेनंतर नाराजगी व्यक्त केली, अशी माहितीही नितेश राणे यांनी दिली.

बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी

अजितदादा पवारांचे सर्वच राजकीय पक्षांशी संबंध होते. त्यांच्या दुर्देवी मृत्यूनंतर निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. ही निवडणूक लढवायची किंवा राजकारण करायची वेळ नाही. त्यामुळे ही पोटनिवणूक बिनविरोध करायची मागणी सर्वच स्तरातून होत आहे.

अंजली दमानिया यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर खरातप्रकरणी आरोप केले आहेत. त्यावर बोलताना नितेश राणेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIT नेमलेली आहे. चौकशीत पोलिस प्रत्येक बारकाईचा अभ्यास करत आहे. असंख्य माता भगिनींच्या भविष्याशी निगडित ही केस असल्याने महत्त्वाची आहे. त्यामुळे कोणाला काही आरोप करायचे असल्यास त्यांनी SIT शी संवाद साधावा, SIT चौकशी करेल, असे नितेश राणेंनी सांगितले.

मुंब्राचे नाव मुंबादेवी करण्याचा निर्धार

दरम्यान, मुंब्राचे नाव मुंबादेवी करण्याचे तिथल्या लोकांची भावना असून मी माझ्या भाषणातून व्यक्त केली. राज्य सरकारपर्यंत हे नाव पोहोचण्याचे काम माझं आहे. काल भाषणाच्या माध्यमातून पोहोचविले, यापुढे पाठपुरावा पण करेन, असे म्हणत मुंब्राचं नाव मुंबादेवी करण्याचा निर्धार नितेश राणेंनी व्यक्त केला.

हेही वाचा

अशोक खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली नाही, थेट बडतर्फ करणार; महसूलमंत्र्यांचा इशारा

Author : सदाशिव लाड, एबीपी माझा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha