Dailyhunt
Pune Crime News: चेंजिंग रूममध्ये CCTV कॅमेरा; कामशेतमध्ये महिलेचा कपडे बदलताना व्हिडीओ काढला अन्..., मालकावर गुन्हा दाखल

Pune Crime News: चेंजिंग रूममध्ये CCTV कॅमेरा; कामशेतमध्ये महिलेचा कपडे बदलताना व्हिडीओ काढला अन्..., मालकावर गुन्हा दाखल

ABP माझा 1 week ago

पुणे: पुण्याच्या कामशेत परिसरात असलेल्या एका दुकानामध्ये कपडे बदलण्यासाठी गेलेल्या महिलेचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या (Pune Crime News) साहाय्याने चित्रीकरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याप्रकरणी कामशेत पोलिसांनी दुकान मालकावर गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. मुकेश मुथा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.(Pune Crime News)

Pune Crime News: पीडितेस दमदाटीही केली

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला मुकेश फॅन्सी कॉर्नर या दुकानात खरेदीसाठी गेली होती. यावेळी दुकान मालक मुकेश मुथा याने दुकानाच्या स्टोअर रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा (Pune Crime News) आहे, हे माहिती असतानाही पीडितेस तिथे कपडे बदलण्यासाठी पाठवले. पीडित महिला कपडे बदलत असताना तिचे जाणीवपूर्वक चित्रीकरण करून, लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य त्याने केले. इतकेच नव्हे तर या प्रकारानंतर त्याने पीडितेस दमदाटीही केली. याप्रकरणी पीडित महिलेने (Pune Crime News) कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ७७ आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ आरोपी मुकेश मुथा याला अटक केली असून, आज त्याला वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले आहे.(Pune Crime News)

Pune Crime News: आरोपीने जाणीवपूर्वक तिचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ...

मिळालेल्या माहितीनुसार, १६ मार्च रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास कामशेत येथील 'मुकेश फॅन्सी कॉर्नर' या दुकानात हा धक्कादायक प्रकार घडला. दुकानमालक मुकेश मुथा (रा. कामशेत, ता. मावळ, जि. पुणे) यांनी संबंधित पीडितेला कपडे बदलण्यासाठी स्टोअररूममध्ये पाठवले. त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा असल्याची माहिती असूनही, आरोपीने जाणीवपूर्वक तिचे कपडे बदलतानाचे चित्रीकरण केल्याचा गंभीर आरोप आहे. या कृत्यामुळे पीडितेच्या मनात लज्जा निर्माण होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीने पीडितेला दमदाटी केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, पोलिसांनी आरोपी मुकेश मुथा याला अटक करून वडगाव मावळ येथील न्यायालयात हजर केले आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.(Pune Crime News)

Author : नाजीम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha