Dailyhunt
Pune Crime: पुण्यातील 'त्या' पोलिसांवर कारवाईचा बडगा; आयटी अभियंता तरुण-तरुणीला धमकावत 10 हजार रुपये उकळण भोवलं, तिघांचं निलंबन

Pune Crime: पुण्यातील 'त्या' पोलिसांवर कारवाईचा बडगा; आयटी अभियंता तरुण-तरुणीला धमकावत 10 हजार रुपये उकळण भोवलं, तिघांचं निलंबन

ABP माझा 1 week ago

Pune Crime News : तरुण तरुणीला शारीरिक संबंधांच्या रॅकेटमध्ये अडकवतो, अशी धमकी (Crime News) देणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांवरकारवाईचाबडगाउगारतयापोलिसांचेअखेर निलंबनकरण्यातआलेआहे. पुण्यातील (Pune Police) वाघोली पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्म चाऱ्यां वर हि कारवाई (Pune Crime News) करण्यात आली आहे . शारीरिक संबंधां च्या रॅकेटमध्ये अडकवण्याची धमकी देऊन आयटी अभियंता तरुण- तरुणी कडून 10 हजार रुपये उकळले होते . या प्रकरणी पोलीस हवालदार किरण अब्दागिरी, पोलीस शिपाई गणेश खाडे आणि किरण कांबळे अशी निलंबित कर्मचाऱ्यांचे नावे आहेत .

दरम्यान, याप्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासमोर तक्रार केल्यानंतर त्यांनीया प्रकरणाची शहानिशा करततपासकेला. तपासाअंतीयातीनहीपोलिसांवरकारवाईचाबडगाउगारण्यातआलाअसूनत्यांनासेवेतूननिलंबितकरण्यातआलंआहे. एकंदरीतयाप्रकरणावरूनपोलीसदलासहपरिसरातएकाचखळबळउडालीआहे.

Pune Crime: पुणे महापालिकेत महिला अधिकारी यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ

दुसरीकडे, पुणे महापालिकेत महिला अधिकारी यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचाप्रकारसमोरआलाआहे. सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त आशा राऊत यांच्या अंगावर धावून शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी कविता पटेकर यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यातआलाआहे. मात्र महापालिकेत वरिष्ठ अधिकारीच असुरक्षित असल्याचेप्रकरणसमोरआल्यानेएकचखळबळउडालीआहे. एक महिना झाले कामा संदर्भात फाइल असून त्यावर आशा राऊत यांनी कार्यवाही केली नाही, असा आरोप कविता पटेकर यांनी केला आहे.

Pune Crime: उलटीचा बहाना करून महिलेने सात लाखांचे सोन्याचे दागिने चोरले, महिलेलाअटक

दरम्यान उलटीचा बहाना करून महिलेने सात लाखांचे सोन्याचे दागिने चोरल्याचीघटनापुण्यातघडलीआहे. पुण्यातील पीएमपीएल बस मधील हि घटना असून वानवडी पोलिसांनी याप्रकरणी दागिने चोरणाऱ्या महिलेला अटक केलीआहे. ननिता कांबळे असं 37 वर्ष अटक करण्यात आलेल्या महिलेच नाव आहे. पीएमपी बसमध्ये 30 मार्चला रात्री दीडच्या सुमारास वैदूवाडी परिसरात हिघटना घडली होती. महिला आणि तिचा पती 30 मार्चला रात्री दीडच्या सुमारास हडपसर ते चिंचवडगाव असा पीएमपीएमएल बसमधून प्रवास करत होते. बसमधील गर्दीचा फायदा दुसऱ्या महिलेने म्हणजेच ननिता तिने घेतला आणि उलटीचा बहाना करून बसमधून खाली उतरताना पर्स मधली चैन उघडून सोन्याच्या दागिन्यांची छोटी पर्स चोरून नेली. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. महिलेला शोधून पोलिसांनी अटक केली.

Author : मिकी घई, एबीपी माझा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha