Dailyhunt
Pune Nasrapur Bhor Crime: ठेचून मारा, अंत्यविधी झाला तरी मला कुणी सांगायला येऊ नका; नसरापूर प्रकरणातील आरोपीची पत्नी काय काय म्हणाली?

Pune Nasrapur Bhor Crime: ठेचून मारा, अंत्यविधी झाला तरी मला कुणी सांगायला येऊ नका; नसरापूर प्रकरणातील आरोपीची पत्नी काय काय म्हणाली?

ABP माझा 3 days ago

Pune Nasrapur Bhor Crime: पुण्यातील नसरापूर येथे घडलेल्या साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणावरून (Pune Nasrapur Bhor Crime) संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणानंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे.

आरोपीला कोर्टाने 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे. मात्र, आरोपीने केलंलं हे पहिलं नाहीतर तिसरं कृत्य आहे. याआधी पुराने नसल्यानं तो 2 वेळा निर्दोष सुटला आहे. त्यामुळे किमान या प्रकरणात तरी त्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी प्रतिक्रिया सर्वच स्तरातून उमटत आहेत.

नसरापूरमधील चिमुरडीवरील अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळलेली असताना, या प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबीयांनी माध्यमांसमोर येत तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. आरोपीचा मुलगा म्हणाला की, मला बाप म्हणून त्याला स्वीकारण्याची लाज वाटते. माझी एकच चूक आहे की मी त्याच्या पोटी जन्मलो. सरकारने त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी. त्याला ठेचून मारायला हवं. त्याने केलेला गुन्हा माफ करण्यासारखा नाही. त्या निष्पाप मुलीला न्याय मिळाला पाहिजे, पीडित मुलगी माझ्या भाची सारखी होती, असंही आरोपीच्या मुलाने सांगितले. (Pune Nasrapur Bhor Crime)

आरोपीची पत्नी काय म्हणाली? (Pune Nasrapur Bhor Crime)

आरोपीला जिवंत जाळा...उभं जाळा...मला त्याचं तोंडही पाहायचं नाही. त्याचा अंत्यविधी झाला तरी मला कुणी सांगायला पण येऊ नका...फाशीची शिक्षा त्याच्यासाठी किरकोळ आहे, त्याला जिवंत जाळलं पाहिजे, असं आरोपीच्या पत्नी म्हणाल्या. मला अकरा नातवंडं आहेत. त्या निष्पाप बाळाच्या आत्म्याला काय वाटलं असेल? तिच्या आईच्या काळजाचा तुकडा गेला, तिला काय वाटत असेल याची मी कल्पना करू शकते. मी सुद्धा कुणाची तरी आईच आहे. घटना घडल्यापासून माझ्या घशाखाली अन्नाचा घास उतरलेला नाही, असंही आरोपीच्या पत्नी म्हणाल्या.

गेल्या 10 वर्षांपासून आरोपीसोबत आमचा संबंध नाही- (Pune Nasrapur Bhor Crime)

आरोपी पतीसोबत आमचा गेल्या 10 वर्षांपासून कोणताही संबंध नाही. मी आणि माझा मुलगा दोघेच एकत्र राहतो. या 10 वर्षांत आम्ही अनेकदा त्याला घरी बोलावण्याचा, नीट वागण्याचा प्रयत्न केला. पण तो नेहमी 'तुझं तू बघ' असं म्हणून आम्हाला झिडकारायचा, अशी प्रतिक्रियाही आरोपीच्या पत्नीने दिली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha