Pune Nasrapur Girl Case : पुण्यातील भोर जिल्ह्यातील नसरापूरमध्ये घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनं राज्य हादरलं, ही संतापजनक घटना जेव्हा समोर आली तेव्हा (Pune Crime News) या आरोपीबाबत देखील धक्कादायक माहिती समोर येऊ लागली.
एका साडेतीन चार वर्षाच्या चिमुकलीवर 65 वर्षाच्या व्यक्तीने अत्याचार (Pune Crime News) करून तिला निर्घृणपणे संपवल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आरोपी नराधमाचे आधीचे काळे कारनामे समोर आले आहेत. नराधम आरोपीवरती 1998 मध्ये पहिला गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यावेळी त्याची सुटका करण्यात आली होती. अशातच पहिल्या केसमधील आरोपीविरुद्ध जबाब देणाऱ्या व्यक्तीने त्या घटनेचा धक्कादायक खुलासा केला आहे.(Pune Nasrapur Girl Case)
नराधम आरोपीच्या पहिल्या केसमधील साक्षीदार व्यक्तीने सांगितलं की, मी त्याच्या पहिल्या केसमध्ये साक्षीदार होतो. मी त्यावेळी कामाला गेलो होतो. रात्री साडेनऊ दहाच्या आसपास मी घरी परत आलो. त्यावेळी तिथे राहणारी एक म्हातारी आजी कशाला तरी बाहेर गेली होती. त्याचा फायदा घेऊन हा आरोपी मोरीत जाऊन लपला. तिथं तो दबा धरून बसला. सगळी वस्ती सामसूम झाल्यानंतर नराधमाने डाव साधला अन् कोयत्याचा धाक दाखवून त्याने त्या वृध्द महिलेवर अत्याचार केला. रात्रीच्या दोन वाजता ही घटना घडली होती, असं कोर्टातील साक्षीदारने सांगितलं.
म्हाताऱ्या आजीसोब नको नको ते केलं,तिचे हाल केले. ती म्हातारी व्यक्ती लाजेनं शर्मेने आम्हाला काहीच बोलली नाही ती तिच्या लेकीकडे निघून गेली. तिच्या जावयाने हे प्रकरण हाताशी घेतलं आणि पोलिसात गुन्हा नोंदवला होता, असं कोर्टातील साक्षीदारने म्हटलं आहे. एका मुक्त पत्रकाराला मुलाखत देताना पहिल्या केसमध्ये साक्षीदाराने अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगितला आहे.
म्हातारीच्या जावयाने गावात त्याला हकलून लावायचा प्रस्ताव देखील ठेवला होता. कोयत्याचा धाक दाखवून त्याने हे कृत्य केलं. त्याला त्याचा आत्मा शांत करायचा होता. त्यामुळे त्याने असं कार्य केलं. आजीचं वय त्यावेळी 60 - 65 वर्ष होतं, असंही कोर्टातील साक्षीदारने यावेळी सांगितलं. पोलिसांना कोर्टात ठोस पुरावे सादर न करता आल्याने त्याची त्यावेळी सुटका झाली होती, असंही माहिती देखील गावकऱ्यांनी यावेळी दिली. तर जेव्हा पहिल्या प्रकरणात पोलिस घटनास्थळी तपास करायला आले होते, तेव्हा त्यांना तिथे रक्त पडलेलं दिसलं होतं, असंही त्या साक्षीदाराने सांगितलं.
नसरापूर प्रकरणाची बाल हक्क आयोगाने दखल घेतली असून आरोपीला कमीत कमी दिवसात मृत्यू दंडाच्या शिक्षेची शिफारस करणार असल्याचं आयोगाकडून सांगण्यात आलंय. बाल हक्क आयोग स्वतः या सगळ्या प्रकरणात लक्ष घालून आरोपीला शिक्षा देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. आरोपीला तातडीने अटक करण्यात आली असून त्याच्यावर पोक्सोसह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माझ्या नवऱ्याला मारून टाका...नराधमाच्या पत्नीची संतप्त प्रतिक्रिया
लैंगिक अत्याचार आणि नंतर हत्या केलेला नराधमाच्या पत्नी आणि मुलाने त्याच्या कृत्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मागील दहा वर्षापासून आम्ही सोबत नाहीत. मुली सोबत केलेल्या कृत्य पाहून त्याला फाशी नाही तर त्याला ठेचून आणि जाळून मारलं पाहिजे अशी प्रतिक्रिया पत्नीने दिली आहे तर बाप म्हणून घ्यायची लाज वाटते असं म्हणत मुलांना संताप व्यक्त केला आहे. बापाने केलेल्या कृत्यामुळे आम्हाला मानसिक त्रास होतोय. त्याला तसंच मारून टाका असं म्हणत नराधमा विरोधात कुटुंब देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यासोबतच पत्नी ढसा ढसा रडून फाशीच्या शिक्षेची मागणी करत आहेत.
Author : अंकिता खाणे

