Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Pune Pimpri Pune Liquor Poisoning: पुण्यात दारु पिऊन 18 जणांचा मृत्यू; आता हादरवणारं कारण आलं समोर, दारुकांड प्रकरणात धक्कादायक माहिती

Pune Pimpri Pune Liquor Poisoning: पुण्यात दारु पिऊन 18 जणांचा मृत्यू; आता हादरवणारं कारण आलं समोर, दारुकांड प्रकरणात धक्कादायक माहिती

ABP माझा 2 weeks ago

Pune Pimpri Pune Liquor Poisoning: पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे (Pune Pimpri Liquor Case) मृत्यूचं तांडव पाहायला मिळालं आणि अवघ्या दोन दिवसांत तब्बल 18 जणांचा मृत्यू झाला.

पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडी - दापोडीत 12 जणांचा मृत्यू झालाय तर पुण्यातील हडपसरमध्ये सहा जण मृत्युमुखी पडले. फुगेवाडीतील आणखी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान या विषारी दारू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Pune Pimpri Liquor Poisoning)

दारुच्या प्रत्येक कॅनमागे अधिकचा नफा मिळावा यासाठी योगेश वानखेडेने दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. उरळी कांचनमधे देशी दारुची भट्टी चालवणाऱ्या राधेश्याम प्रजापतीकडून योगेश वानखेडे 35 लिटरचा एक कॅन एकोणीसशे रुपये या दराने दारु खरेदी करायचा. त्यानंतर ती दारु तो पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील विविध दारु गुत्त्यांवर सत्तावीसशे रुपये प्रति कॅन या दराने विकायचा. मात्र ती दारु दुप्पट करण्यासाठी ऑनलाईन मागवलेलं मिथेनॉल मिसळायचा. ज्यामुळे दारुचे प्रमाण वाढले. मात्र ही दारु अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली. (Pune Pimpri Liquor Poisoning)

आतापर्यंत या प्रकरणात 8 जणांना पोलिसांकडून अटक- (Pune Pimpri Liquor Poisoning)

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील दारूकांड प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग केला. याप्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात हडपसर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मोगले , एपीआय सिकलगर आणि पोलीस उपनिरीक्षक मुलानी यांना निलंबित करण्यात आलं आहे. आतापर्यंत या प्रकरणात 8 जणांना पोलिसांनी अटक केली असून यातील 4 आरोपींना 8 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? (Devendra Fadnavis On Pune Pimpri Liquor Poisoning)

सदर प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणात माझं पुणे पोलीस आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे. कुठल्या ठिकाणी विषारी दारू तयार झाली हे पोलिसांनी शोधून काढलेले आहे. याच्या पाठीमागे जे काही लोक आहेत, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आणखी काही लोक यात असू शकतात. ते शोधण्याचे काम सध्या सुरू आहे. ज्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना उपचार करून वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही घटना अत्यंत गंभीर आहे. ज्या ठिकाणी हे सगळं तयार झालं त्याच्या पाठीमागे कोण-कोण आहेत हे पोलीस शोधून काढत आहेत. आतापर्यंत आठ लोकांना अटक झाली आहे. अजून काही लोकांना अटक होऊ शकते. या प्रकरणातील संपूर्ण साखळी शोधून त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल. कारण ही एक प्रकारे हत्याच आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

घाणेरड्या दारूमुळे मृत्यू, सरकार कुठे आहे? रोहित पवारांचा संताप, VIDEO:

संबंधित बातमी-

Pimpri Crime liquor poisoning: पुण्यातील विषारी दारुकांड नेमकं उघडकीस कसं आलं, आतापर्यंत किती मृत्यू? A टू Z माहिती

Author : मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha