Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Rahu Mahadasha: 2026 ते पुढचे 18 वर्ष...राहू महादशेचा 4 राशींवर मोठा प्रभाव! मोठं यश की मोठी सत्त्वपरीक्षा? काय आहे ही महादशा? तुमची रास?

Rahu Mahadasha: 2026 ते पुढचे 18 वर्ष...राहू महादशेचा 4 राशींवर मोठा प्रभाव! मोठं यश की मोठी सत्त्वपरीक्षा? काय आहे ही महादशा? तुमची रास?

ABP माझा 3 weeks ago

Rahu Mahadasha: वैदिक ज्योतिषशास्त्रनुसार राहू महादशा (Rahu Mahadasha) म्हणजे एक असा कालावधी आहे, ज्यामध्ये राहू ग्रहाचा तुमच्या आयुष्यावर सर्वाधिक प्रभाव असतो. ही महादशा साधारण 18 वर्षे चालते आणि व्यक्तीच्या आयुष्यात अचानक घडामोडी, अनपेक्षित वळणं आणि वेगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन येते.

राहू हा प्रत्यक्ष ग्रह नसून तो छाया ग्रह मानला जातो, त्यामुळे त्याचा स्वभावही थोडा गूढ, भ्रम निर्माण करणारा आणि आकर्षण वाढवणारा असा असतो. 2026 वर्षात कोणत्या राशींवर याचा सर्वात जास्त प्रभाव जाणवतो? किंवा त्याचे काय परिणाम होतील? जाणून घ्या...

राहू महादशेत मोठं यश किंवा मोठी परीक्षा...(Rahu Mahadasha)

ज्योतिषशास्त्रानुसार, राहू महादशा हा असा काळ आहे जो तुम्हाला खूप काही देऊ शकतो, पण त्याच वेळी तुमची परीक्षा देखील घेतो. जर तुम्ही योग्य विचार, संयम आणि जागरूकता ठेवली तर हा काळ तुमच्या आयुष्यात मोठी प्रगती घडवू शकतो, आणि जर चुकीच्या निर्णयांमध्ये अडकला तर गोंधळ आणि अडचणी वाढवू शकतो. अनेक वेळा आयुष्यात असे बदल होतात जे आधी कल्पनेतही नसतात, जसं की अचानक करिअर बदल, परदेशात जाण्याची संधी किंवा नवीन क्षेत्रात प्रवेश. योग्य स्थितीत राहू असेल तर व्यक्तीला मोठं यशही मिळू शकतं. त्याच वेळी राहू महादशा नेहमी सोपी नसते. कारण राहू भ्रम, गोंधळ आणि चुकीच्या आकर्षणाशीही जोडलेला आहे. त्यामुळे या काळात कधी कधी निर्णय घेण्यात अडचणी येतात, मन अस्थिर होतं किंवा चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवण्याची शक्यता वाढते. नातेसंबंधांमध्ये गैरसमज होऊ शकतात आणि मानसिक ताणही जाणवू शकतो. काही लोकांना या काळात स्वतःची दिशा शोधण्यात वेळ लागतो.

राहू महादशेचा प्रभाव 4 राशींवर अधिक, काय परिणाम होणार?

ज्योतिषशास्त्रानुसार, 2026 मध्ये राहू मीन राशीत गोचर करत असल्यामुळे काही राशींवर त्याचा महादशेसारखा तीव्र प्रभाव जाणवू शकतो. कोणत्या राशींवर याचा मोठा परिणाम जाणवेल? जाणून घेऊया...

मीन (Pisces)

ज्योतिषशास्त्रानुसार, राहू तुमच्या स्वतःच्या राशीत असल्यामुळे हा काळ खूप प्रभावशाली असेल. तुमच्या विचारांमध्ये मोठा बदल होईल, नवीन दिशा मिळेल पण थोडा गोंधळही जाणवू शकतो. काही वेळा निर्णय घेण्यात संभ्रम निर्माण होईल. करिअरमध्ये अचानक संधी मिळू शकतात, पण योग्य निवड करणं महत्वाचं ठरेल. आध्यात्मिक गोष्टींकडे आकर्षण वाढेल.

कन्या (Virgo)

ज्योतिषशास्त्रानुसार, राहू कुंडलीत (7व्या) स्थानी असल्यामुळे नातेसंबंधांवर परिणाम होईल. लग्न, पार्टनरशिप किंवा व्यवसायात गैरसमज होऊ शकतात. काही नवीन लोक आयुष्यात येतील पण त्यांच्यावर लगेच विश्वास ठेवू नका. आर्थिक व्यवहारात सावध राहणं आवश्यक आहे. योग्य निर्णय घेतल्यास परदेशी संधीही मिळू शकते.

मिथुन (Gemini)

ज्योतिषशास्त्रानुसार, राहू कुंडलीत दशम स्थानात असल्यामुळे करिअरमध्ये मोठे बदल दिसतील. नवीन जॉब, प्रमोशन किंवा अचानक बदल होण्याची शक्यता आहे. काही वेळा कामाचा ताण वाढेल आणि दिशाभूल होऊ शकते, पण योग्य प्लॅनिंग केल्यास मोठी प्रगती शक्य आहे. समाजात ओळख वाढण्याची शक्यता आहे.

धनु (Sagittarius)

ज्योतिषशास्त्रानुसार, राहू कुंडलीत चतुर्थ स्थानात असल्यामुळे मानसिक अस्थिरता जाणवू शकते. घर, प्रॉपर्टी किंवा कुटुंबाशी संबंधित काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. वारंवार घर बदल किंवा स्थलांतराचे योग आहेत. मन शांत ठेवणं खूप गरजेचं आहे. आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या.

हेही वाचा

May 2026 Monthly Horoscope: पुढच्या 24 तासांत 6 राशींची श्रीमंतीकडे वाटचाल! मे महिन्याची जबरदस्त सुरूवात, 12 राशींसाठी कसा जाणार? पैसा, नोकरी, प्रेम...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Author : एबीपी माझा वेब टीम

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha