Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Rahul Gandhi Nashik: नाशिकमधील आदिवासी विद्यार्थ्यांना राहुल गांधींच्या कार्यालयातून फोन गेला, दुपारी दोन वाजताची वेळ मिळाली, नाशिकमध्ये वातावरण तापणार?

Rahul Gandhi Nashik: नाशिकमधील आदिवासी विद्यार्थ्यांना राहुल गांधींच्या कार्यालयातून फोन गेला, दुपारी दोन वाजताची वेळ मिळाली, नाशिकमध्ये वातावरण तापणार?

ABP माझा 1 week ago

Rahul Gandhi to Visit Nashik: आदिवासी विद्यार्थ्यांचे नाशिकच्या (Nashik Adivasi Student Protest) ईदगाह मैदान येथे गेल्या 16 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. यापैकी तीन विद्यार्थी गेल्या दहा ते बारा दिवसांपासून आमरण उपोषण करत आहे.

या आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी हजारो विद्यार्थ्यांनी काल (1 सप्टेंबर) नाशिकच्या आदिवासी विकास भवनावर मोर्चा काढला. प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या मागण्यांचं निवेदन देखील स्वीकारलंय. तर सरकारकडून देखील विद्यार्थ्यांसोबत सातत्याने चर्चा सुरू आहे. मात्र निर्णय होत नसल्याने विद्यार्थ्यांकडून आदिवासी मंत्री अशोक उइके यांच्या राजीनामाची मागणी केली जात आहे. आदिवासी मंत्री हे राजीनामा देत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका आंदोलन विद्यार्थ्यांनी घेतली आहे. दरम्यान, आज दुपारी दोन वाजेच्या दरम्यान राहुल गांधी यांच्यासोबत दहा ते बारा विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ भेट घेणार आहेत. (Rahul Gandhi to Visit Adivasi Student Protest)

दरम्यान, उद्या म्हणजेच 3 सप्टेंबरला ठाकरे सेनेचे नेते आदित्य ठाकरे हे विद्यार्थ्यांची भेट घेईल एकूणच सरकारने दोन दिवसात मागण्या मान्य न केल्यास तीव्र स्वरूपाच आंदोलन छेडणार, असा इशारा आंदोलक विद्यार्थ्यांनी दिला आहे.

Rahul Gandhi: राहुलगांधींच्या कार्यालयातूनआंदोलक विद्यार्थ्यां फोन, भेटीचंनियोजन

राहुल गांधी Gen-Z चेलीडरआहेत. त्यांनीविद्यार्थ्यांच्यामागण्यासंदर्भातआवाजउठवावा. आमच्यामागण्यास्पष्टआहे. त्यासंदर्भातआम्हीसरकारसोबतपाठपुरावाकरतोआहेत. मात्रत्यावरठोसनिर्णयहोतनाहीये. त्यामुळेआम्हीराहुलगांधींनाविनंतीकरू, तेविरोधीपक्षनेतेआहेत. त्यामुळेते आमच्या प्रश्नावरआवाजउठवतील, अशीप्रतिक्रिया आंदोलक विद्यार्थांनीबोलतानाव्यक्तकेलीआहे. दुसरीकडॆराहुलगांधींच्या कार्यालयातूनआंदोलक विद्यार्थ्यां फोनआलाअसूनदुपारीदोनवाजताच्यासुमारासभेटहोणारअसल्याचीमाहितीआहे.

Rahul Gandhi to Visit Nashik: काँग्रेस नेते राहुल गांधींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजाप करणार आंदोलन

ऐकीकडे राहुल गांधी काँग्रेस जिल्हाध्यक्ष यांच्यां निवासी शिबिराच्या समारोपाला येत असताना दुसरीकडे भाजपकडून आंदोलन करतराहुलगांधींच्यायादौऱ्यालाविरोधदर्शवलाजाणारआहे. नारी वंदन विधेयकाला काँग्रेसने विरोध केल्याबद्दल नाशिक भाजपकडून निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर होणाऱ्या आंदोलनात भाजपच्या प्रमुख पदाधिकारी सहभागी होणारआहे. काँग्रेसने नारी विधेयकाला विरोध केल्याने भाजपकडून काळे कपडे परिधान करून तसेच काळेफिती लावून निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी नाशिक दौऱ्यावर असताना भाजपकडून नारी वंदन विधेयकाच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यातयेणारअसल्याचीमाहितीआहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Author : शुभम बोडके

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha