Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम

Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम

ABP माझा 3 months ago

Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरे हे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मेंदूवरील फिंगरप्रिंट तपासायची भाषा करतात. पण राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पक्षाकडे एकही आमदार किंवा खासदार नाही.

मुंबई महानगरपालिकेत (BMC) त्यांचे फक्त सहा नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायची आवश्यकता आहे, अशा शब्दांत मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम (Ameet Shah) यांनी राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विद्यार्थी आंदोलनावरुन भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले. (Maharashtra Politics news)

राज ठाकरेंनी भाषण केले आणि आरोप केले, यात नवीन काय आहे? घरात बसून स्टेटमेंट करतात, कार्यकर्त्यांसमोर जे थोडे बहुत राहिले आहेत त्यांच्यासमोर बोलतात. राज ठाकरे हे स्टँडअप कॉमेडियन झाले आहेत. शिवउद्योग स्थापन करत किती मराठी तरुणांना उद्योगधंदे दिलेत, याचे उत्तर राज ठाकरे देऊ शकत नाही. स्वत: काय केलं हे सांगायचं नाही. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी अनेक योजना राबवल्या. अनेक लाखो युवकांना स्कील डेव्हलपमेंटचे काम झाले आहे.

एमएसएमई काय आहेत? युवक-युवती यांनी उद्योगधंदे स्थापन केले आहेत. स्टार्टअप इंडियासारख्या योजना राबवल्या. भारताची अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकाची झाली आहे. राज ठाकरेंनी यावर बोलावे. फालतू ॲक्टिंग करण्यापेक्षा मेरिटवर डिबेट करावे. त्यांना मराठी माणसांचा पुळका आला आहे. त्यांचे ॲडमिशन बालमोहनमध्ये घेऊन दाखवावेच, अशी टीका अमित साटम यांनी केली.

Uddhav Thackeray: राहुल गांधी, उद्धव ठाकरे हे मेरिटवर बोलत नाहीत: अमित साटम

मुख्यमंत्री पदावर असताना 90 टक्के आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. त्यांचे मुख्यमंत्रीपद, पक्ष, चिन्ह गेले. त्यांच्याकडे आता रोज टीका करण्याशिवाय दुसरे काम उरलेले नाही. मुख्यमंत्री पदावर असताना ते घराबाहेर कितीवेळा पडले याचा तपशील द्यावा. पालिकेत सत्ता असताना मुंबईकरांसाठी केलेले एक काम दाखवावे याचे चॅलेंज आहे, असे अमित साटम यांनी म्हटले. राहुल गांधी, उद्धव ठाकरे हे मेरिटवर बोलत नाहीत. मुद्द्यांवर बोलायला त्यांच्याकडे तपशील नाहीत. मिश्किलपणे बोलायचे हेच उद्योग ते करत आहेत, अशी टीका अमित साटम यांनी केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha