Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Raja Shivaji Box Office Collection Day 4: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'च्या कमाईत चौथ्या दिवशी कमालीची घट; आतापर्यंत किती कोटींची कमाई?

Raja Shivaji Box Office Collection Day 4: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'च्या कमाईत चौथ्या दिवशी कमालीची घट; आतापर्यंत किती कोटींची कमाई?

ABP माझा 2 weeks ago

Raja Shivaji Box Office Collection Day 4: रितेश देशमुख (Riteish Deshmukh) दिग्दर्शित 'राजा शिवाजी' सिनेमाची (Raja Shivaji Movie) सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी 'राजा शिवाजी' सिनेमा रिलीज करण्यात आला आणि अवघ्या महाराष्ट्रानं सिनेमा पाहण्यासाठी गर्दी केली.

महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) शौर्याची गाथा सांगणाऱ्या या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर (Raja Shivaji Box Office Collection) दमदार सुरुवात केली. तसेच, मराठी सिनेसृष्टीतील (Marathi Film Industry) सर्वात मोठा ओपनिंग वीकेंड करणारा चित्रपट ठरलाय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, रितेश देशमुखनं दिग्दर्शित केलेल्या या पहिल्याच सिनेमानं प्रेक्षकांना भूरळ घातली आहे. सिनेमाच्या कमाईचे आकडे ऐकून हे लक्षात येतंच. पण, तीन दिवस धमाकेदार कमाई करणाऱ्या या सिनेमाच्या कलेक्शनमध्ये चौथ्या दिवशी मात्र काहीशी घट पाहायला मिळाली.

रिलीजच्या चौथ्या दिवशी 'राजा शिवाजी' सिनेमाचं कलेक्शन किती? (Raja Shivaji Box Office Collection Day 4)

रणवीर सिंह अभिनीत 'धुरंधर 2'नंतर, रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' हा सिनेमा या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला दुसरा सिनेमा मानला जातोय. प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्याच्या शेवटी (Opning Weekend) जबरदस्त कमाई केल्यानंतर, या मराठी सिनेमानं त्याची सोमवारची कठीण परीक्षा (Monday test) यशस्वीरित्या पास केली आहे. 'सॅकनिल्क'च्या (Sacnilk) आकडेवारीनुसार, प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी, म्हणजे, पहिल्या विकेंडनंतरचा पहिला सोमवारी 'राजा शिवाजी'नं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर अंदाजे 5.60 कोटी रुपयांची कमाई केली. आधीच्या तीन दिवसांच्या तुलनेत ही कमाई खूपच कमी असली तरीसुद्धा सिनेमानं सोमवारची टेस्ट पास केली आहे.

आतापर्यंतची 'राजा शिवाजी' सिनेमाची कमाई किती? (Raja Shivaji Box Office Net Collection)

'सॅकनिल्क'नं दिलेल्या आकडेवारीनुसार, 1 मे 2026 रोजी रिलीज झालेल्या 'राजा शिवाजी' सिनेमाला आता चार दिवस झालेत. या सिनेमानं चार दिवसांत धुवांधार कमाई केली आहे. पण, सोमवारी या सिनेमाच्या कमाईत काहीशी घट पाहायला मिळाली. 'राजा शिवाजी' सिनेमानं सोमवारी 5.60 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.

'राजा शिवाजी' सिनेमानं शुक्रवारी रिलीज होताच, दमदार कमाई करत इतिहास रचला. सिनेमानं शुक्रवारी म्हणजेच, रिलीजच्या पहिल्याच दिवशी 12.40 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सिनेमानं 11.50 कोटी कमावले. रविवारी मात्र सिनेमानं बक्कळ कमाई केली. 'राजा शिवाजी' सिनेमानं रविवारी तब्बल 13.10 कोटी रुपयांची कमाई केली, रविवारच्या तुलनेत सोमवारी या सिनेमाची कमाई निम्म्याहून कमी झाली. चार दिवसांत या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 42.60 कोटी रुपयांचं कलेक्शन केलंय.

'राजा शिवाजी' सिनेमाच्या कमाईचे आकडे

  • पहिला दिवस, 1 मे 2026 : 12.40 कोटी
  • दुसरा दिवस, 2 मे 2026 : 11.50 कोटी
  • तिसरा दिवस, 3 मे 2026 : 13.10 कोटी
  • चौथा दिवस, 4 मे 2026 : 5.60 कोटी

    एकूण कमाई : 42.60 कोटी

दरम्यान, प्रख्यात अभिनेता रितेश देशमुख याची प्रमुख भूमिका असलेला, 'राजा शिवाजी' हा अलिकडील मराठी चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन करण्यासोबतच, रितेश देशमुखनं यात मुख्य भूमिकाही साकारली असून, तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपात पडद्यावर अवतरला आहे. तर, त्याच्यासोबतच सिनेमात बॉलिवूडची तगडी स्टारकास्ट झळकली आहे.

Raja Shivaji Box Office Collection: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'नं बॉक्स ऑफिस हादरवलं; अवघ्या 3 दिवसांत काळजाला भिडला, कमाई किती?

Author : एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha