Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Raja Shivaji Box Office Collection: 'राजा शिवाजी'ची जगभरात गर्जना! बॉक्स ऑफिसवर अक्षरशः वादळ; 30 दिवसांनंतर कलेक्शन किती?

Raja Shivaji Box Office Collection: 'राजा शिवाजी'ची जगभरात गर्जना! बॉक्स ऑफिसवर अक्षरशः वादळ; 30 दिवसांनंतर कलेक्शन किती?

ABP माझा 2 weeks ago

Raja Shivaji Box Office Collection: रितेश देशमुख दिग्दर्शित व अभिनित 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या महिनाभरात मराठी सिनेसृष्टीचे अनेक रेकॉर्ड मोडत 115.97 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे.

1 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या झंजावाताने भल्याभल्यांना नमवलं. बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) या चित्रपटाने मराठी मनोरंजनसृष्टीचे अनेक रेकॉर्ड मोडले. शिवाय 'राजा शिवाजी' हा जागतिक स्तरावर सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला आहे.

'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?

अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुख यांच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवला असून जगभरात तब्बल ₹115.97 कोटींची कमाई केली आहे. भारतात ₹111.70 कोटींचे ग्रॉस कलेक्शन तर ओव्हरसीज मार्केटमध्ये ₹4.27 कोटींची कमाई करत या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीचा झेंडा जागतिक स्तरावर रोवला आहे. तसेच चित्रपटाचे नेट कलेक्शन ₹94.56 कोटींवर पोहोचले आहे. तब्बल 89,752 शोमधून हा आकडा या चित्रपटाने गाठलाय.

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 13.51 कोटी रुपये कमावत सर्वाधिक ओपनिंग कलेक्शन केले होते. पहिल्या आठवड्यात 52.65 कोटी रुपये या चित्रपटाने कमावले. दुसऱ्या आठवड्यापासून या चित्रपटाचा कलेक्शनचा ग्राफ काहीसा उतरला असला तरी दुसऱ्या आठवड्यातही 24.30 कोटी रुपये कमवत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दबदबा निर्माण केला. तर तिसऱ्या आठवड्यात 12 कोटी रुपये या चित्रपटाने कमवले. प्रदर्शनाच्या चौथ्या आठवड्यात 4.80 कोटी रुपयांचा आकडा गाठत पाचव्या आठवड्यात झोकात एन्ट्री घेतली. शुक्रवार आणि शनिवारी 0.32 कोटी तर 0.58 कोटी रुपये कमवत भारतभरात एकूण नेट कलेक्शन 94.56 कोटी रुपयांवर गेले आहे.

बॉक्स ऑफिसवर 30 दिवस दबदबा

अनेक बॉलिवूड कलाकारांची फौज असलेल्या या चित्रपटाची प्रदर्शना पूर्वीपासूनच प्रचंड चर्चा होती. 100 कोटींचं बजेट असणाऱ्या या चित्रपटाने बजेट तर वसूल केलंच पण शिवरायांच्या पराक्रमाची भव्य सिनेमॅटिक अनुभूती प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर करून गेली. महाराष्ट्रासह देशभरातील प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे मराठी प्रेक्षकांसोबत हिंदी प्रेक्षकांनीही चित्रपटाला मोठा पाठिंबा दिल्याचे बॉक्स ऑफिस आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. सोशल मीडियावरही 'राजा शिवाजी'ची जोरदार चर्चा सुरू आहे. या यशामुळे मराठी चित्रपट मोठ्या बजेटमध्ये आणि जागतिक स्तरावरही प्रभाव निर्माण करू शकतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Author : abp majha web team

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha