Raja Shivaji Movie At Home: रितेश देशमुख (Riteish Deshmukh) अभिनीत आणि दिग्दर्शित 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या मराठी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा गल्ला जमवला.
मराठी प्रेक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत आणि हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेवर आधारीत 'राजा शिवाजी' या सिनेमाला भरभरुन प्रतिसाद दिला. 'राजा शिवाजी' हा सिनेमा 1 मे 2026 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. यानंतर नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही हा सिनेमा प्रदर्शित झाला. जर तुम्हाला हा चित्रपट सिनेमागृहात किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पाहायला वेळ मिळाला नसेल तर, तुम्ही हा सिनेमा आता घरबसल्या अगदी फ्रीमध्येही (Television) पाहू शकता. पण कुठे अन् कधी? (Star Gold) जाणून घेऊयात.
घरबसल्या फ्रीमध्ये 'राजा शिवाजी' प्रेक्षकांना पाहायला मिळणार (Raja Shivaji Gets World TV Premiere)
'राजा शिवाजी' या मल्टीस्टारर सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. सिनेमागृहात या चित्रपटाची जादू चालल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. 26 जून 2026 रोजी 'राजा शिवाजी' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर स्ट्रीम करण्यात आला. ओटीटीवर हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर ज्यांना थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पाहता आला नाही, त्यांना हा सिनेमा घरबसल्या पाहण्याची संधी मिळाली. नेटफ्लिक्सवरही 'राजा शिवाजी' या सिनेमाला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला. आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाल्यानंतर हा चित्रपटाचा टेलिव्हिजन प्रीमिअर होणार आहे. हा सिनेमा नेमकं कोणत्या चॅनेलवर टेलिकास्ट होणार? पाहूयात.
'राजा शिवाजी' या ऐतिहासिक सिनेमाची वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअरची घोषणा करण्यात आली आहे. हा ऐतिहासिक सिनेमा आपल्याला घरबसल्या 'स्टार गोल्ड' या वाहिनीवर पाहता येणार आहे. यासंदर्भातील पोस्ट सोशल मीडियावरही शेअर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 'राजा शिवाजी' हा सिनेमा प्रेक्षकांना हिंदी यांसह मराठी भाषेतही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या दोन्ही भाषेत प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता येणार आहे. 'स्टार गोल्ड' या वाहिनीवर 'राजा शिवाजी' हा सिनेमा 12 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. हा सिनेमा आपण 8 वाजता पाहू शकता.
'राजा शिवाजी' हा ऐतिहासिक सिनेमा 1 मे 2026 रोजी सिनेमागृहात रिलीज झाला होता. जिओ स्टुडिओज फिल्म्सच्या बॅनरखाली तयार करण्यात आलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन रितेश देशमुख याने केले आहे. या सिनेमात रितेश देशमुख, जिनेलिया देशमुख, अभिषेक बच्चन, संजय दत्त, विद्या बालन, महेश मांजरेकर, फरदीन खान, भाग्यश्री, सचिन खेडेकर, अमोल गुप्ते, बोमन इराणी, जितेंद्र जोशी, मोहित टाकळर यांच्या मुख्य आणि भूमिका आहेत.
इतर बातम्या:
Author : भाग्यश्री कांबळे

