Dailyhunt
Rajat Patidar Catch Controversy Video : रजत पाटीदार वादग्रस्तरित्या आऊट; विराट कोहली संतापला, भर मैदानात घातला राडा, अंपायरला झापलं, नेमकं काय घडलं?

Rajat Patidar Catch Controversy Video : रजत पाटीदार वादग्रस्तरित्या आऊट; विराट कोहली संतापला, भर मैदानात घातला राडा, अंपायरला झापलं, नेमकं काय घडलं?

ABP माझा 1 week ago

Rajat Patidar Catch Controversy GT vs RCB IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यातील आयपीएल 2026 चा 42 वा सामन्यात मैदानावरचा पारा चांगलाच चढला. आरसीबीचा फलंदाज रजत पाटीदार याला ज्या पद्धतीने आऊट देण्यात आलं, त्यावरून किंग विराट कोहली आणि हेड कोच अँडी फ्लॉवर थेट पंचांशी भिडल्याचं पाहायला मिळालं.

नेमकं प्रकरण काय?

प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबीची सुरुवात खराब झाली होती. 35 धावांवर दोन विकेट्स पडल्यानंतर रजत पाटीदार आणि देवदत्त पडिक्कल डाव सावरत होते. 8 व्या षटकात गुजरातच्या अरशद खानने एक शॉर्ट चेंडू टाकला. पाटीदारने त्यावर पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटच्या वरच्या कडेला लागून हवेत उडाला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला उभ्या असलेल्या जेसन होल्डरने धावत जाऊन चेंडू टिपला.

होल्डरने झेल घेतल्याचा दावा केला, पण रिप्लेमध्ये चेंडू जमिनीला स्पर्श करत असल्याचा संशय दिसत होता. तरीही थर्ड अंपायरने चेंडूवर पूर्ण नियंत्रण असल्याचं मानत पाटीदारला बाद ठरवलं. हा निर्णय येताच पाटीदार स्तब्ध झाला. त्याने पंचांकडे धाव घेत संताप व्यक्त केला. चेंडू ग्राऊंडला लागला आहे, हे ओरडून सांगत असतानाही पंचांनी त्याला मैदानाबाहेर जाण्यास सांगितलं.

विराट संतापला अन् कोचची एन्ट्री...

पाटीदार बाद झाल्यानंतर डगआऊटमध्ये बसलेला विराट कोहली स्वतःवरचं नियंत्रण गमावून बसला. आपल्या सहकाऱ्यावर अन्याय झाला आहे असं वाटताच विराटच्या चेहऱ्यावरचा संताप स्पष्ट दिसत होता. दुसरीकडे, आरसीबीचे हेड कोच अँडी फ्लॉवर यांनी थेट 'फोर्थ अंपायर' गाठला. पंचांसोबत त्यांचा जोरदार वाद झाला. स्क्रीनवर चेंडू जमिनीला लागल्याचं स्पष्ट दिसत असताना 'आऊट' कसं दिलं गेलं? हा सवाल त्यांनी आक्रमकपणे विचारला.

पाटीदार आणि कोहलीची खेळी

या संपूर्ण वादाच्या नाट्यात रजत पाटीदारला 19 धावांवर (15 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार) माघारी परतावं लागलं. विराट कोहलीनेही आक्रमक सुरुवात केली होती, त्याने 13 चेंडूत 28 धावा (5 चौकार, 1 षटकार) केल्या. मात्र, पंचांच्या या एका चुकीच्या निर्णयामुळे आरसीबीच्या गोटात तीव्र नाराजी पसरली आहे.

Harbhajan Singh News : आप सोडून भाजपमध्ये गेलेल्या हरभजन सिंगने हायकोर्टाचं दार ठोठावलं; पंजाब सरकारला थेट चॅलेंज, नेमकं वातावरण का पेटलं?

Author : किरण महानवर<

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha