Dailyhunt
Rajya Sabha Oath: शरद पवार, ज्योती वाघमारे, रामदास आठवले, रामराव वडकुते, माया ईवनाते आज राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेणार; पाहा नवनिर्वाचित सदस्यांची यादी!

Rajya Sabha Oath: शरद पवार, ज्योती वाघमारे, रामदास आठवले, रामराव वडकुते, माया ईवनाते आज राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेणार; पाहा नवनिर्वाचित सदस्यांची यादी!

ABP माझा 5 days ago

Rajya Sabha Oath: दिल्लीतील संसदेत आज नवनिर्वाचित राज्यसभा (Rajya Sabha) सदस्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांनंतर विविध राज्यांतील दिग्गज नेते आज शपथ घेणार असून महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचा त्यात समावेश आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar), केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale), तसेच रामराव वडकुते (Ramrao Wadkute), माया ईवनाते (Maya Ivnate) आणि ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) आज शपथ घेणार आहेत.

राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन या नव्या सदस्यांना शपथ देणार आहेत. दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) अधिकृतपणे राज्यसभा सदस्य म्हणून संसदेत पाऊल ठेवतील. विनोद तावडे 10 एप्रिलला शपथ घेण्याची शक्यता आहे आहे. तर पार्थ पवार (Parth Pawar) यांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेवर पहिल्यांदाच निवड झाली आहे. पार्थ पवार 9 एप्रिलला शपथ घेतील.

महाराष्ट्रातील 7 नवनिर्वाचित राज्यसभा सदस्यांची यादी-

  1. विनोद तावडे (Vinod Tawde)- भाजप (महायुती)
  2. रामदास आठवले (Ramdas Athawale)- भाजप (महायुती)
  3. माया चिंतामण ईवनाते (Maya Ivnate)- भाजप (महायुती)
  4. रामराव वडकुते (Ramrao Wadkute)- भाजप (महायुती)
  5. ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare)- शिवसेना शिंदे गट
  6. पार्थ पवार (Parth Pawar)- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
  7. शरद पवार (Sharad Pawar)- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (महाविकास आघाडी- शिवसेना ठाकरे गट-काँग्रेसचा पाठिंबा)

महाराष्ट्रातील 48 लोकसभा खासदारांची यादी- (Maharashtra ALL MP List)

अनुक्रममतदारसंघविजयी उमेदवारपक्ष
1अहमदनगर Ahmednagarनिलेश लंकेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
2अकोला Akolaअनुप धोत्रेभाजप
3अमरावती Amravatiबळवंत वानखेडेकाँग्रेस
4औरंगाबाद Aurangabadसंदीपान भुमरेशिवसेना
5बारामती Baramatiसुप्रिया सुळेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
6बीड Beedबजरंग सोनवणेभाजप
7भंडारागोंदिया Bhandara Gondiyaडॉ. प्रशांत पडोळेकाँग्रेस
8भिवंडी Bhiwandiबाळ्या मामा म्हात्रेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
9बुलढाणा Buldhanaप्रतापराव जाधवशिवसेेना
10चंद्रपूर Chandrapurप्रतिभा धानोरकरकाँग्रेस
11धुळे Dhuleसुभाष भामरेभाजप
12दिंडोरी Dindoriभास्कर भगरेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
13गडचिरोली Gadchiroli - Chimurडॉ. नामदेव दासाराम किरसानकाँग्रेस
14हातकलंगणे Hatkanangaleधैर्यशील मानेशिवसेना
15हिंगोली Hingoliनागेश पाटील आष्टीकरशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
16जळगाव Jalgaonस्मिता वाघभाजप
17जालना Jalnaकल्याणराव काळेकाँग्रेस
18कल्याण Kalyanश्रीकांत शिंदेशिवसेेना
19कोल्हापूर Kolhapurछत्रपती शाहू महाराजकाँग्रेस
20लातूर Laturशिवाजीराव काळगे काँग्रेस
21माढा Madhaधर्यशील मोहिते पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
22मावळ Mavalश्रीरंग बारणेशिवसेेना
23Mumbai Northपियुष गोयलभाजप
24Mumbai North Centralवर्षा गायकवाडकाँग्रेस
25Mumbai North Eastसंजय दिना पाटीलशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
26Mumbai North Westरवींद्र वायकर शिवसेना
27Mumbai Southअरविंद सावंतशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
28Mumbai South Centralअनिल देसाईशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
29नागपूर Nagpurनितन गडकरीभाजप
30नांदेड Nandedवसंतराव चव्हाणकाँग्रेस
31नंदुरबार Nandurbarगोवाल पाडवीकाँँग्रेस
32नाशिक Nashikराजाभाऊ वाजेशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
33उस्मानाबाद Osmanabadओमप्रकाश निंबाळकरशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
34पालघर Palgharहेमंत सावराभाजप
35परभणी Parbhaniसंजय जाधवशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
36पुणे Puneमुरलीधर मोहोळभाजप
37रायगड Raigadसुनिल तटकरेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
38रामटेक Ramtekश्यामकुमार बर्वेकाँग्रेस
39रत्नागिरी, सिंधुदुर्ग Ratnagiri- Sindhudurgनारायण राणेभाजप
40रावेर Raverरक्षा खडसेभाजप
41सांगली Sangliविशाल पाटीलअपक्ष
42सातारा Sataraउदयनराजे भोसलेभाजप
43शिर्डी Shirdiभाऊसाहेब वाकचौरेशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
44शिरुर Shirurअमोल कोल्हेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
45सोलापूर Solapurप्रणिती शिंदेकाँग्रेस
46ठाणे Thaneनरेश म्हस्केशिवसेेना
47वर्धा Wardhaअमर काळेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
48यवतमाळ-वाशिम Yavatmal- Washimसंजय देशमुखशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

Rajya Sabha Election 2026 Maharashtra Candidate Full List: पवार, आठवले, वाघमारे, तावडे...7 जागा, 7 उमेदवार; राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून कुणाला उमेदवारी?, पाहा फायनल यादी!

Author : मुकेश चव्हाण

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha