Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Rakhi Sawant on Ranveer Singh: 'दम असेल तर सलमान खानला बॅन करा...'; रणवीर सिंहच्या FWICE प्रकरणात राखी सावंतची उडी, VIDEO

Rakhi Sawant on Ranveer Singh: 'दम असेल तर सलमान खानला बॅन करा...'; रणवीर सिंहच्या FWICE प्रकरणात राखी सावंतची उडी, VIDEO

ABP माझा 2 weeks ago

Rakhi Sawant attacks Farhan Akhtar and FWICE: बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) सध्या 'डॉन 3' सिनेमामुळे चर्चेत आहे.

'धुरंधर' (Dhurandhar) अॅक्टरने 'डॉन 3' (Don 3) या सिनेमातून अचानक काढता पाय घेतला. यानंतर फरहान अख्तरने फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजकडे धाव घेतली. तसेच तक्रार दाखल केली. यानंतर FWICEनं रणवीर सिंहविरोधात मोठं पाऊल उचललं. त्यांनी अभिनेत्याविरोधात असहकार निर्देश जारी केले. शूटिंग सुरू व्हायला 3 आठवडे बाकी असताना, निर्माते आणि दिग्दर्शकाबरोबर झालेल्या वादामुळे अभिनेत्यानं चित्रपटातून माघार घेतली. दरम्यान, अशातच आता रणवीर सिंहच्या समर्थनार्थ काही कलाकार मैदानात उतरले आहेत. काही कलाकारांनी रणवीर सिंहला सपोर्ट केला आहे. फेमस गर्ल राखी सावंत (Rakhi Sawant) हिनं देखील रणवीर सिंहला समर्थन दर्शवलं आहे.

रणवीर सिंहला राखीचा सपोर्ट...म्हणाली.. (Rakhi Sawant Supports Ranveer Singh Amid Don 3 Controversy)

मुंबईमध्ये पापाराझींसोबत बोलताना राखी सावंतने फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज आणि फरहान अख्तरवर जोरदार टीका केली. तिनं यावेळी बॉलिवूडचा भाईजान सलमान खान यांच्या नावाचा उल्लेख केला. 'ज्यांनी रणवीर सिंहला बॅन केलं. त्यांचा मी निषेध करते. मला खूप राग येतोय. रणवीर आज एक सुपरस्टार आहे. याच कारणामुळे त्याच्यावर जळणारे भरपूर आहेत. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहने मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये नाव कमावले आहे', असं राखी म्हणाली.

रणवीर सिंहचा सपोर्ट करत असताना राखीनं सलमान खानच्या नावाचाही उल्लेख केला. तिनं FWICEला थेट आव्हान दिले आहे, 'जर या लोकांकडे खरंच इतकी ताकद असेल तर, सलमान खानला बॅन करा. फक्त सलमान भाईला हात लावून दाखवा. भाई एकटे सर्वांचीच बँड वाजवतील. रणवीर आणि दीपिका दोघेही आपल्या मेहनतीने पुढे आले आहेत', असंही राखी म्हणाली.

राखीचा फरहान अख्तरवरही निशाणा (Rakhi Sawant attacks Farhan Akhtar and FWICE)

राखी सावंतने फरहान अख्तरवरही टीकेचे बाण सोडले. 'फरहान अख्तरचे ना कधी सिनेमे हिट झाले, ना कधी ते इतके चर्चेत राहिले. आता तो स्वत:च्या प्रसिद्धीसाठी रणवीर सिंहच्या नावाचा वापर करत आहे. आता कुठे ते लाइमलाइटमध्ये आहेत', अशा तिखट शब्दांत राखीनं फरहानवर टोला लगावला.

इतर बातम्या:

'...तर एव्हाना मुलं झाली असती', वयावरुन ट्रोल करणाऱ्यांना शमिता शेट्टीकडून सडेतोड उत्तर, नेमकं काय म्हणाली?

ABP माझाच्या बातम्या LIVE...

Author : एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha