Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनला तुमच्या भावाच्या राशीनुसार बांधा 'या' रंगाची राखी; वाचा मेष ते मीन 12 राशींनुसार शुभ रंग आणि महत्त्व

Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनला तुमच्या भावाच्या राशीनुसार बांधा 'या' रंगाची राखी; वाचा मेष ते मीन 12 राशींनुसार शुभ रंग आणि महत्त्व

ABP माझा 2 weeks ago

Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधन हा फक्त बहिणीने भावाला राखी बांधण्याचा सण नाहीये. ज्योतिष शास्त्रानुसार, रंग, ग्रह आणि राशीचा देखील खास संबंध रक्षाबंधनशी (Raksha Bandhan 2026) जोडण्यात आला आहे.

अशा वेळी जर तुम्हीसुद्धा भावासाठी अजून राखी घेतली नसेल तर भावाच्या राशीनुसार रंग कसा निवडावा हे या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. या राशीचे भाऊ फार उत्साही आणि ऊर्जेने परिपूर्ण असतात. या भावांसाठी तुम्ही लाल, नारंगी किंवा गडद लाल रंगाची राखी निवडू शकता.

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांचा संबंध शुक्र ग्रहाशी मानला जातो. या राशीच्या लोकांना पांढऱ्या, क्रिम, गुलाबी किंवा हलका निळा रंग शुभ मानला जातो. या रंगांच्या राख्या शोभू शकतात.

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. बुध ग्रहाशी संबंधित हिरवा रंग या राशीसाठी अनुकूल मानला जातो. त्यामुळे तुम्ही भावांना हिरवा, ऑलिव्ह ग्रीन किंवा हलक्या हिरव्या रंगाची राखी निवडू शकता.

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीचा संबंध चंद्राशी जोडण्यात आला आहे. या राशीच्या लोकांना पांढरा, सिल्व्हर आणि हलका निळा रंग शुभ मानला जातो. तुम्ही या राशीच्या भावांना मोती रंगाची राखी देखील बांधू शकता.

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीचा स्वामी सूर्य ग्रह आहे. त्यामुळे सोनेरी, नारिंगी, लाल किंवा पिवळा रंग या राशीच्या लोकांसाठी शुभ मानला जातो. तुम्ही या राशीच्या भावांना सूर्य किंवा ओमची डिझाईन असणारी राखी बांधू असतात.

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना तुम्ही हिरव्या रंगाची राखी बांधू शकता. तसेच, हिरवा, पिस्ता रंग राखीसाठी शुभकारक ठरु शकतो.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. या राशीच्या लोकांसाठी गुलाबी, पांढरा, क्रीम आणि आकाशी रंग शुभकारक मानला जातो. या राशीच्या भावांना मोती, सिल्व्हर रंगाची शेड असणारी राखी शोभून दिसेल.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. या राशीच्या लोकांना लाल, मरुन किंवा गडद नारिंगी रंग शुभकारक मानला जातो.

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीचा स्वामी गुरु ग्रह म्हणजेच बृहस्पती ग्रह आहे. पिवळा, सोनेरी आणि हलका नारिंगी रंग या राशींसाठी शुभकारक मानला जातो.

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे. या राशीच्या भावांना तुम्ही निळा, नेव्ही ब्लू आणि गडद रंग शुभकारक मानला जातो. या राशीच्या भावांना तुम्ही साधी डिझाईन असलेली राखी बांधू शकता.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनिदेव आहे. यासाठी तुम्ही निळा, किंवा वांगी कलरच्या रंगाची राखी बांधू शकता. या राशीच्या लोकांना युनिक पॅटर्न असलेल्या राख्या आवडतात.

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीचा स्वामी बृहस्पती ग्रह आहे. या राशीच्या लोकांना पिवळा, हलका नारिंगी, सोनेरी रंग शुभकारक मानला जातो. या राशीच्या लोकांना पारंपारिक पद्धतीच्या राख्या आवडतात.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर बातम्या :

Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनच्या दिवशी 3 ग्रहांची वक्री चाल, एका ग्रहाचा अस्त; 'या' 4 राशींचा सुवर्णकाळ सुरु, नशिबाचे फासे पलटणार

Author : एबीपी माझा वेब टीम

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha