Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Rinku Rajguru Aakash Thosar: रिंकू राजगुरू अन् आकाशच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण; चाहत्याच्या 'त्या' प्रश्नावर म्हणाली,'मी तयार आहे, आकाशला विचारायला हवं'

Rinku Rajguru Aakash Thosar: रिंकू राजगुरू अन् आकाशच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण; चाहत्याच्या 'त्या' प्रश्नावर म्हणाली,'मी तयार आहे, आकाशला विचारायला हवं'

ABP माझा 1 week ago

Rinku Rajguru Akash Thosar: मराठी मनोरंजनसृष्टीतला ' सैराट' चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटातून अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर यांची जोडी महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली.

अजूनही रिंकू आणि आकाशची जोडी एकत्र आली की प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. चित्रपटाला 10 वर्ष होऊन गेली असली तरी दोघांमधील केमिस्ट्रीची एकच चर्चा रंगते. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात रिंकू आणि आकाश यांनी एकत्र पोज दिल्याने त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं होतं.

रिंकू आणि आकाश रिलेशनशिपमध्ये ?

रिंकूला अनेकदा हा प्रश्न विचारण्यात येतो. अलीकडेच तिने सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. यात तिला आकाशसोबत नात्यात आहेस का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर तिने आम्ही फक्त चांगले मित्र आहोत असं उत्तर दिलं . पण आणखी एका प्रश्नाला तिनं 'मी तयार आहे आकाशला विचारायला हवं ' असं उत्तर दिल्याने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या.

'मी तयार आहे, आकाशला विचारायला हवं'

सैराट चित्रपटानंतर रिंकू राजगुरुने झिम्मा 2, पुन्हा एकदा साडे माडे तीन, खिल्लार, आशा, कागर अशा अनेक चित्रपटांमध्ये ती दिसली. हिंदी वेब सिरीज ही तिने केल्या. तर आकाश ठोसर याने FU, लस्ट स्टोरीज, घर बंदूक बिर्याणी, या वेब सिरीज-चित्रपटांमध्ये दिसला. 2023 नंतर आकाशचा एकही सिनेमा आला नाही. शिवाय आकाश आणि रिंकू ने सैराट नंतर नागराज मंजुळे यांचा 'झुंड' सिनेमात छोटी भूमिका केली होती. मात्र या सिनेमानंतर ते पुन्हा एकत्र दिसले नाहीत.

दरम्यान दोघे पुन्हा कधी एकत्र दिसणार ? असा प्रश्न तिला चाहते विचारत आहेत. दरम्यान, 'आस्क मी' सेशन दरम्यान विचारलेल्या एका प्रश्नावर रिंकू नाही नुकतच उत्तर दिलं. एका चाहत्याने तिला विचारलेलं 'तू आणि आकाश फिल्म कधी करणार परत? यावर ती म्हणाली 'मी तयार आहे आकाशला विचारायला हवं.' दरम्यान काही दिवसांपूर्वी रिंकू आणि आकाश नुकतेच एका इव्हेंट मध्ये एकत्र दिसले होते. त्यानंतर त्या दोघांच्या बॉण्डची एकच चर्चा झाली.

Author : abp majha web team

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha