Riteish Deshmukh Raja Shivaji Defeated Bhooth Bangla: अक्षय कुमारचा (Akshay Kumar) सिनेमा 'भूत बंगला' (Bhooth Bangla) सध्या जोरदार चर्चेत आहे. गेल्या 10 दिवसांत या सिनेमानं थिएटर्समध्ये (Bhooth Bangla Box Office Collection) 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
मात्र, 'भूत बंगला' बॉक्स ऑफिसवर अपेक्षित असलेली जादू निर्माण करण्यात अपयशी ठरला आहे. अशातच एका आगामी सिनेमानं, जो अजून रिलीजही झालेला नाही, त्यानं 'भूत बंगला'ला पछाडलं आहे. या सिनेमानं आतापर्यंत तब्बल 70 कोटींचा नफा कमावला आहे. रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) या सिनेमानं प्रदर्शित होण्यापूर्वीच सिनेसृष्टीत मोठी खळबळ उडवून दिली आहे.
रिलीजपूर्वीच 'राजा शिवाजी'नं 193 कोटींची कमाई कशी केली? (Raja Shivaji Box Office Collection)
सध्या सगळीकडे रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' सिनेमाचीच चर्चा रंगली आहे. 'राजा शिवाजी' सिनेमाच्या 'नॉन-थियेट्रिकल' (Non-Theatrical Rights) हक्कांचे एकूण मूल्य 193 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. ही रक्कम सिनेमाच्या बजेटपेक्षा खूपच जास्त आहे. परिणामी, सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच निर्मात्यांना मोठा नफा मिळवणं शक्य झालंय.
'राजा शिवाजी'चे OTT हक्क 95 कोटी रुपयांना विकले गेलेत. तर, म्युझिक राइट्समधून 28 कोटी रुपये मिळालेत, तर सॅटेलाईट राइट्स 70 कोटी रुपयांना निश्चित करण्यात आलेत. या तीनही रक्कमांची बेरीज केली तर, 'राजा शिवाजी'नं प्रत्यक्ष प्रदर्शनापूर्वीच एकूण 193 कोटी रुपयांचा व्यवसाय केलाय. या सिनेमाचं बजेट अंदाजे 120 कोटी रुपये असल्याचं मानलं जातंय. त्यामुळे, प्रोडक्शन टीमनं आतापर्यंतच 70 कोटी रुपयांहून अधिक नफा कमावला आहे.
'राजा शिवाजी' कधी रिलीज होणार? (Raja Shivaji Released Date)
'राजा शिवाजी' हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित आहे. यामध्ये रितेश देशमुख मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे. अनेकजण याकडे एक ऐतिहासिक गाथा म्हणून पाहत असले, तरी काहीजण सिनेमाचा ट्रेलर आणि त्यातील सीन्सबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. सिनेक्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, प्रदर्शनापूर्वीच इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेला व्यवसाय हा कोणत्याही सिनेमासाठी एक सकारात्मक संकेत असतो. ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म्स, म्युझिक कंपन्या आणि टीव्ही चॅनल्सनी या सिनेमावर आपला विश्वास दर्शवला आहे. जर या सिनेमानं थिएटर्समध्ये चांगली कामगिरी केली, तर तो एक 'ब्लॉकबस्टर' सिनेमा ठरू शकतो. 'राजा शिवाजी' हा सिनेमा 1 मे रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे.
Author : एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क</

