Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सलग चार वेळा इंधनाच्या दरात वाढ, आता पुन्हा पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? मंत्री हरिदीप सिंग पुरी यांनी दिली महत्वाची माहिती

सलग चार वेळा इंधनाच्या दरात वाढ, आता पुन्हा पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? मंत्री हरिदीप सिंग पुरी यांनी दिली महत्वाची माहिती

ABP माझा 1 week ago

Petrol Diesel Price : गेल्या महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. या वाढीमुळं सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसला आहे. इंधनाच्या दरात सलग चार वेळा झालेल्या दरवाढीमुळे भविष्यात आणखी वाढ होणार का?

अशी भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, आता सरकारने एक निवेदन जारी केले असून, त्यामुळं काहीसा दिलासा मिळाला आहे.

तेल कंपन्यांना तोटा

खरं तर, केंद्रीय मंत्री हार्दिक सिंग पुरी यांनी नुकतेच एका पत्रकार परिषदेत तेल दरातील बदलांवर भाष्य केले आहे. गुरुवारी जारी केलेल्या या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी उत्पादन खर्चापेक्षा कमी दरात विकल्यामुळे 30 जूनपर्यंत सरकारी तेल कंपन्यांना 74781 कोटी रुपयांचा (747.81 अब्ज रुपये) तोटा झाला आहे. मध्य पूर्वेतील तणावाच्या काळात कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या वाढीमुळे हा तोटा झाला आहे.

लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचणार नाहीत

मंत्र्यांनी पुढे स्पष्ट केले की, आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती आता कमी झाल्या असल्या तरी, तेल कंपन्या सध्या त्याच कच्च्या तेलावर प्रक्रिया करत आहेत जे त्यांनी सुमारे दोन महिन्यांपूर्वी जास्त किमतीत खरेदी केले होते. त्यामुळे, याचा लाभ ग्राहकांपर्यंत लगेच पोहोचणार नाही.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होऊ शकतात

हरदीप सिंग पुरी पुढे म्हणाले, की जर कच्च्या तेलाच्या किमती पुढील दोन ते तीन महिने कमी राहिल्या, तरच आम्ही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याचा विचार करू शकतो. याबद्दल आता काहीही बोलणे घाईचे ठरेल. मध्य-पूर्वेतील संकटाच्या काळात, अनेक विकसित देशांमध्ये पेट्रोलच्या किमती अंदाजे 20 टक्क्यांनी आणि भारताच्या शेजारील देशांमध्ये 35 टक्क्यांनी वाढल्या. मात्र, भारतात पेट्रोलच्या किमती केवळ 5.58 टक्क्यांनी वाढल्या. या काळात देशातील 1.07 लाखांहून अधिक पेट्रोल पंपांवर इंधनाचा पुरवठा अखंडितपणे सुरू होता. हे लक्षात घेण्यासारखे आहे की नायरा एनर्जीने अलीकडेच 1 जुलै रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली होती. एका पत्रकार परिषदेत मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केले की, नायरा एनर्जी लिमिटेडने संकटाच्या काळात दरात प्रति लिटर 5 रुपयांनी वाढ केली होती. त्यामुळे, कंपनीने दर कमी करणे योग्यच आहे.

US Iran Deal : अमेरिका आणि इराण शांतता करारावर स्वाक्षरी,युद्ध संपताच क्रूड ऑईलचे दर गडगडले, भारतात पेट्रोल डिझेल किती रुपयांना?

Author : एबीपी माझा वेब टीम

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha