Dailyhunt
Salman Khan Friend Death: 'भावा'च्या निधनानं पुरता खचला सलमान खान; डोळ्यात आसवं, भावनांचा बांध फुटला; पोस्ट करत म्हणाला...

Salman Khan Friend Death: 'भावा'च्या निधनानं पुरता खचला सलमान खान; डोळ्यात आसवं, भावनांचा बांध फुटला; पोस्ट करत म्हणाला...

ABP माझा 2 weeks ago

Salman Khan Friend Death: बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानच्या (Salman Khan) अत्यंत जवळच्या व्यक्तीचा निधन झाल्याची बातमी समोर आलीय. गेल्या चार दशकांपासून भावाप्रमाणे सोबत केलेल्या सलमान खानचा जिवलग मित्र सुशील कुमार (Sushil Kumar) यांचे निधन झाले आहे.

मित्राच्या जाण्याने सलमान खानला मोठा धक्का बसलाय. त्याने रविवारी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत आपल्या जिगरी मित्राला श्रद्धांजली वाहिली. (Salman Khan Friend Death)

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे खूप कमी लोक आहेत जे स्वतः पुरता विचार न करता समोरच्यासाठी काहीतरी करायला जातात. इंडस्ट्रीमध्ये सलमान खानच्या मैत्रीविषयी अनेकजण बोलतात. 'मैत्री निभवणारा' अशी त्याची इंडस्ट्रीत खास ओळख आहे. गेल्या 42 वर्षांपासून जिवलग मित्र असणाऱ्या सुशील कुमार या सलमानच्या मित्राचे निधन झाल्यामुळे त्याला मोठा धक्का बसलाय. त्याने instagram वर मित्रासाठी एक खास भावनिक पोस्ट केली आहे.

सलमानची भावासारख्या जिवलग मित्रासाठी पोस्ट

42 वर्षांची मैत्री आठवत सलमान खानने लिहिलं, 'हा माणूस गेल्या 42 वर्षांपासून माझ्यासाठी भावासारखा होता. अत्यंत चांगला, दयाळू आणि नेहमी मदतीसाठी तत्पर. कितीही कठीण परिस्थिती असली तरी तो नेहमी हसतमुख, नाचणारा आणि बेफिकीर असायचा. आर्थिक, भावनिक किंवा शारीरिक अडचण असली तरी तो म्हणायचा, काही फरक पडत नाही, सगळं ठीक होईल.' मित्राच्या जिद्दीचं कौतुक करत सलमानने पुढे लिहिलं, 'त्याचं नाव सुशील कुमार होतं… किंवा किमान 5 मिनिटांपूर्वी तरी होतं. अलविदा भाऊ! तू खर्‍या अर्थाने आयुष्य जगलास आणि मृत्यूशी एका चॅम्पियनसारखी लढाई दिलीस.'

'तुझ्यासाठी अश्रू नाहीत, फक्त आठवणी'

सलमान खान म्हणाला, 'भाऊ, तुझ्यासाठी अश्रू नाहीत, फक्त आठवणी आणि हसू आहे. 'माझा भाऊ हसत-हसत या जगातून गेला. सगळ्यांनाच एक दिवस जायचं आहे, कधी आणि कसं माहीत नाही, त्यामुळे काहीतरी करून जा,' असं त्यांनी लिहिलं. पोस्टच्या शेवटी त्याने म्हटलं, 'आता तुझी सिगारेट आणि व्हिस्की एन्जॉय कर, चीयर्स भाऊ… तुझी खूप आठवण येईल.'

भावनिक फोटो आणि आणखी एक पोस्ट

सलमान खानने मित्र सुशील कुमारसोबतचा एक फोटो शेअर करत ही पोस्ट लिहिलीय.काही वेळाने त्याने आणखी एक भावनिक पोस्ट केलीये. जा आता त्याचे डोळे भरून आले आहेत. या पोस्टखाली त्याने लिहिलं, 'ज्याला जायचं आहे त्याला कधी थांबवू नका. ज्याने बोलावलं आहे तो घेऊनच जातो. प्रत्येकाला एक दिवस जावंच लागतं. चांगल्या माणसाला लवकर बोलावलं जातं. आणि शेवटी उरतात ते वाईट लोक.'

तो पुढे म्हणाला, ' आनंदी रहा भाऊ… तू या जगातून गेला आहेस. मी तुझ्या पत्नीशी बोललो, तिला माहिती आहे तू तिला कोणासाठी सोडलंस. काश मी रडू शकलो असतो, राग काढू शकलो असतो… पण तुझ्यासाठी एकही अश्रू नाही.' शेवटी त्यांनी लिहिलं, 'RIP नाही भाऊ… मजेत राह, चीयर्स!'

सलमानच्या आगामी कामाविषयी..

कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, सलमान खान लवकरच 'SVC63' या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहेत, ज्यात ते नयनतारासोबत स्क्रीन शेअर करणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन वामशी पेडीपल्ली करत आहेत आणि हा चित्रपट ईद 2027 ला रिलीज होणार आहे. तसेच 'मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस' या चित्रपटातही ते झळकणार आहेत, ज्यात चित्रांगदा सिंहही आहे. या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप जाहीर झालेली नाही.

Author : जयदीप मेढे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha