Who Is Balraj Singh Ghai Friend Of Samay Raina: कॉमेडियन समय रैना (Samay Raina) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण चर्चेत येण्यामागचं कारण 14 महिन्यांपूर्वीचं प्रकरण नसून, त्यानं अलिकडेच शेअर केलेला व्हिडीओ आहे.
'स्टिल अलाइव्ह' या व्हिडीओमुळे समय पुन्हा एकदा ट्रेन्डिंगवर आला आहे. या व्हिडीओत त्यानं 14 महिन्यांत नेमकं काय काय घडलं? याची आपल्या शैलीत माहिती दिली. या व्हिडीओत त्यानं वारंवार एका मित्राचा उल्लेख केला. समय रैनाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे बलराज सिंह घई (Balraj Singh Ghai). मित्र वणव्यात गारव्यासारखा असतो, असं त्याच्या व्हिडीओतून स्पष्ट झालं. यावरुन आयुष्यात बलराजसारखा मित्र हवा, असं अनेकांना वाटलं असेल. दरम्यान, बलराज सिंह नेमका आहे तरी कोण? समय रैना आणि बलराज यांच्यातील बॉण्डिंग कशी वाढली? असा प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
बलराज नेमका आहे तरी कोण? (Samay Rainas Friend Balraj Singh Ghai)
बलराजचं पूर्ण नाव बलराज सिंह घई असं आहे. 'द हॅबिटॅट' या ठिकाणी समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोचे चित्रीकरण सुरु होते, ते ठिकाण बलराजच्या मालकिचे आहे. 'द हॅबिटॅट' हा स्टूडिओ मुंबईत उपस्थित आहे. माहितीनुसार, बलराज हा परमजीत सिंह घई यांचा मुलगा असून, ते युनिकॉन्टिनेंटल हॉटेल्सच्या व्यवसायात कार्यरत आहेत. आतापर्यंत समय आणि बलराजने आपल्या मैत्रीविषयी कधीही कॅमेऱ्यासमोर उघडपणे चर्चा केलेली नाही. परंतु, रेडिटमध्ये केलेल्या दाव्यानुसार, दोघांमध्ये पूर्वीपासून मैत्री आहे.
एकानं रेडिटवर लिहिले की, जेव्हा समय आपल्या करिअरची सुरुवात करत होता, तेव्हा बलराजने बऱ्याचदा त्याला कार्यक्रमांसाठी त्याचे 'द हॅबिटॅट' हे ठिकाण विनामूल्य दिले होते. हळूहळू त्यांच्यातील प्रोफेशनल बॉण्डिंग एका अतुट मैत्रीत रुपांतरित झाली. समयने आपल्या 'स्टिल अलाइव्ह' या शोमध्ये सांगितले की, 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमुळे झालेल्या वादाच्यावेळी मी बलराजसोबत यूएसमध्ये होतो. बलराजच्या बायकोनं एक व्हिडीओ पाठवला होता. या व्हिडीओत बलराजचे आई वडील हे तरुण पोलीस अधिकाऱ्यांच्या पाया पडत होते. आम्हाला जाऊ द्या, आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही, अशी विनवणी करत होते', असं समय म्हणाला.
मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, दु:ख अडवायला उंबऱ्यासारखा (Balraj Singh Information)
वाद आणि अडचणी असूनही बलराजने कधीही समयची साथ सोडलेली नाही. त्यानं शेवटपर्यंत, भारतात येईपर्यंत समयची साथ दिली. समय आणि बलराज दोघेही लवकरच 'इंडियाज गॉट लेटेंट' चा दुसरा सिझन घेऊन येत आहेत. व्हिडीओच्या शेवटपर्यंत समय बलराजच्या मैत्रीबद्दल सांगत होता. बलराजचे हेच गुण कौतुकास्पद आहे, असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. यातून असे दिसून येते की, बलराज सिंह हा केवळ समयचा एक मित्र नसून, जेव्हा संपूर्ण जग त्याच्या विरोधात होते, तेव्हा तो समयच्या पाठीशी उभा होता.
इतर बातम्या:
'बिग बॉस मराठी 6' अंतिम टप्प्यात, या आठवड्यात कोण बाद होणार? विशाल की...
Author : भाग्यश्री कांबळे

