Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Samay Raina Fan Kissed His Photo For 10 Minutes Video: समय रैनाचा क्रेझी फॅन, जमिनीवर झोपला अन् फोटोला 10 मिनिटं किस करत राहिला; VIDEO पाहून स्वतः कॉमेडियन हैराण, म्हणाला, 'FIR करा...'

Samay Raina Fan Kissed His Photo For 10 Minutes Video: समय रैनाचा क्रेझी फॅन, जमिनीवर झोपला अन् फोटोला 10 मिनिटं किस करत राहिला; VIDEO पाहून स्वतः कॉमेडियन हैराण, म्हणाला, 'FIR करा...'

ABP माझा 3 days ago

Samay Raina Fan Kissed His Photo For 10 Minutes Video: समय रैना (Samay Raina)... हे नाव सध्या भलतंच चर्चेत आहे. प्रसिद्ध कॉमेडियन समय रैना (Comedian Samay Raina) 'इंडियाज गॉट लेटंट' (Indias Got Latent) शो वादाच्या भोवऱ्यात अडकला आणि तेव्हापासूनच समय रैना प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचला, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

त्यानंतर समय रैना पुन्हा एकदा वादग्रस्त ठरलेला शोचाच दुसरा सीझन घेऊन परतला आहे. 'इंडियाज गॉट लेटंट 2'चे (Indias Got Latent Season 2) एपिसोड्स ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज केले जातात. नुकताच रिलीज करण्यात आलेला एपिसोडसुद्धा बिहारी आणि काश्मिरी पंडित यांच्यावरच्या वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला. एवढं असूनही समयचे फॅन्स त्याच्यासारखेच क्रेझी आहेत. त्याचा अवखळ स्वभाव आणि एखाद्याला शब्दांत घेरण्याची त्याची कला चाहत्यांना भलतीच आवडते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात संबंधित व्यक्तीनं समयच्या फोटोला तब्बल दहा मिनिटं किस केलंय. बरं हा व्हायरल व्हिडीओ समय रैनापर्यंत पोहोचला असून त्यानंही यावर भन्नाट कमेंट केलीय.

स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाबद्दलची (Stand-Up Comedian Samay Raina) चाहत्यांची क्रेझ काही औरच... तो कितीही वेळा वादात सापडला तरी, लोकांचं त्याच्याबद्दलचं वेड कधीच कमी होत नाही. आता, एका चाहत्यानं समय वरच्या प्रेमाचं प्रदर्शन इतक्या विचित्र पद्धतीनं केलंय की, ते पाहून स्वतः समय रैनाही ओशाळला आहे. समय रैनानं स्वतः आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या चाहत्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात संबंधित व्यक्तीनं समय रैनाच्या फोटोला तब्बल दहा मिनिटं किस केलंय.

चाहत्याचं वेड्यासारखं प्रेम पाहून समय रैना ओशाळला (Samay Raina Reacts To Fan Kissing His Photos On Pillow For 10 Minutes)

चाहत्यानं उशीवर समय रैनाचा फोटो चिकटवला आणि सलग दहा मिनिटं त्याच्या फोटोला किस करत राहिला. जमिनीवर झोपून तो त्याच्या फोटोला किस करतच राहिला. ही विचित्र कृती इंटरनेटवर व्हायरल झाली आहे. स्वतः समय रैनानं हा व्हिडीओ शेअर करुन त्यावर कमेंट केली आहे.

समय रैनानं "ओह मॅन!" अशी कमेंट केलीय. त्यानं त्याच्या या लाडक्या चाहत्याचा व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलाय आणि गंमतीनं लिहिलंय की, "कृपया या माणसाविरुद्धही कोणीतरी एफआयआर (FIR) दाखल करा..." आणि त्यासोबत हसून-हसून डोळ्यात पाणी येणारा इमोजी (Crying Laughing Emoji) जोडलाय. या व्हिडीओवर चाहत्यांकडून अनेक गंमतीशीर प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी त्यांच्या लाडक्या चाहत्यावर टीकाही केली आहे आणि केवळ 'क्लिकबेट'साठी लोक अशा प्रकारची कृत्य करून व्हिडीओ बनवतात, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काहींनी तर याला "चीप कंटेंट" (Cheap Content) असंही म्हटलंय.

समय रैना सध्या नेटफ्लिक्सवर प्रसारित होणाऱ्या 'इंडियाज गॉट लेटंट' (India's Got Latent) या शोच्या दुसऱ्या सीझनमुळे प्रचंड चर्चेत आहे. या शोच्या अलीकडील एपिसोडमध्ये अर्चना पूरण सिंह, ओरी, शेरॉन वर्मा आणि निशांत सुरी हे पॅनेलिस्ट म्हणून उपस्थित होते. कधीकाळी युट्युबर रणवीर अलाहाबादियानं केलेल्या काही वक्तव्यांमुळे हा शो थांबवावा लागला होता आणि त्यावरून मोठा वाद निर्माण झालेला. मात्र, आज परिस्थिती पूर्णपणे बदलली असून समय रैनाचं नशीब उजळलंय. नुकतंच मुंबईतील सायबर-जागरूकता कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समय रैनाचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान त्यानं मुंबई पोलिसांची मिश्किलपणे फिरकीही घेतली. समय रैनाच्या कारकिर्दीतील हा सकारात्मक बदल पाहून त्याचे चाहते खूप आनंदी आहेत.

Bhau Kadam On Shooting And Fmaily Time: भाऊ कदम काम नसताना काय करतात? 'त्या' प्रश्नावर म्हणाले, 'घरी बसल्यावर अनेक विचार...'

Author : एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha