मुंबई: पुण्यातील दौऱ्यावेळी महाविद्यालयात अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढायला लावल्याच्या प्रकरणानंतर आता भाजप आक्रमक झाल्याचं चित्र दिसून आलं. त्यानंतर काल (मंगळवारी, ता १) भाजप युवा मोर्चाच्यावतीने मुंबईत मनसेच्या (MNS) विरोधात आंदोलन करण्यात आले.
भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर येऊन आंदोलन करणार असल्याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच मोठ्या संख्येने मनसेचे (MNS) कार्यकर्ते आणि पदाधिकारी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या घरासमोर एकवटले होते. मनसे कार्यकर्त्यांची इतकी मोठी फौज शिवाजी पार्कच्या परिसरात उभी असल्याने कृष्णराज महाडिक आणि भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना शिवाजी पार्कची वेसही ओलांडता आली नाही. त्यानंतर आज या सर्व घडामोडींच्या दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव न घेता त्यांना लक्ष्य केलं आहे.(Sandeep Deshpande)
Sandeep Deshpande : भाजपचा पहिला "फेकू " कोण ?
संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी सोशल मिडीयावरती पोस्ट करत म्हटलं की, "गटारातून गॅस तयार करणारा, ढग असतील तर रडार काम करत नाही हे ज्ञान देणारा, 15लाख तुमच्या खात्यात जमा करतो हे फेकणारा भाजपचा पहिला "फेकू " कोण ?", असं म्हणत भाजपला पुन्हा एकदा डिवचलं आहे, यानंतप आता भाजपकडून कोणती प्रतिक्रिया येते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे.(Sandeep Deshpande)
MNS: मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजयुमोला शिवाजी पार्कची वेसही ओलांडून दिली नाही
पुण्यातील महाविद्यालयात अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढायला लावल्याच्या निषेधार्थ मंगळवारी भाजप युवा मोर्चाच्यावतीने मुंबईत मनसेच्या (MNS) विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर येऊन आंदोलन करणार असल्याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच मोठ्या संख्येने मनसेचे (MNS) कार्यकर्ते आणि पदाधिकारी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या घरासमोर एकत्र आले होते.
मनसे कार्यकर्त्यांची इतकी मोठी फौज शिवाजी पार्कच्या परिसरात उभी असल्याने कृष्णराज महाडिक आणि भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना शिवाजी पार्कची वेसही ओलांडता आली नाही. कृष्णराज महाडिक हे भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांसह माहीम आणि माटुंग्यातून राज ठाकरे यांच्या घराकडे येणार होते. मात्र, मनसे आणि भाजयुमोचे कार्यकर्ते भिडण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी दादर आणि माहीम दोन्ही ठिकाणी कडेकोट बंदोबस्त लावला. कृष्णराज महाडिक यांनी पोलिसांचा डोळा चुकवून माहीम येथून शिवतीर्थकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अमित ठाकरेने तमाशा केला, त्याचा विरोध म्हणून इथे आलो आहोत. पंतप्रधान मोदी असतील, राष्ट्रपती यांचा प्रोटोकॉलप्रमाणो फोटो लावणे बंधनकारक असते, असे त्यांनी म्हटले.
कृष्णराज महाडिक आणि भाजयुमोचे कार्यकर्ते माटुंगा आणि माहीम परिसरात असल्याचे समजताच मनसेच्या काही नेत्यांनी तुकड्या करुन उलट भाजयुमोला गाठण्यासाठी माहीम आणि माटुंगा परिसर गाठला. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना एकमेकांना भिडू दिले नाही. मनसेचे गजानन काळे आणि इतर काही कार्यकर्ते बेधडकपणे भाजयुमोचे कार्यकर्ते असलेल्या माटुंगा परिसरात शिरले. मात्र, पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले. सध्या संदीप देशपांडे, अविनाश जाधव हे दोघेही राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर आहेत. राज ठाकरेंच्या कट्टर कार्यकर्त्यांची इतकी मोठी फौज तैनात असल्याने तुर्तास भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांचे घर सोडाच पण शिवाजी पार्कची वेसही ओलांडता येण्याची शक्यता फार कमी दिसत आहे.
Author : अंकिता खाणे

