Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Sandeep Deshpande: मोदी 'व्हिक्टिम कार्ड'....;  विद्यार्थ्यांना माफ करण्याच्या पंतप्रधानांच्या सोशल मिडियावरील व्हिडीओवर संदिप देशपांडे भडकले

Sandeep Deshpande: मोदी 'व्हिक्टिम कार्ड'....; विद्यार्थ्यांना माफ करण्याच्या पंतप्रधानांच्या सोशल मिडियावरील व्हिडीओवर संदिप देशपांडे भडकले

ABP माझा 1 week ago

मुंबई : आपल्यावर टिका, अपशब्द बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना माफ केल्याच्या वक्तव्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ सद्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे, यावर मनसे नेते संदिप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी टिका केली आहे.

माफी मागीतली कोणी असा सवाल करीत कार्यकर्ते कोणाच्या ही पोस्टवर खालच्या भाषेत टिका करतात, त्यांना शिकवा असं सांगताना राम मंदिर चोरी प्रकरणातील लोकांना माफ केलं की नाही असा प्रश्न देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी उपस्थित केला. पोलिस कारवाईचा मुद्दा उपस्थित करीत पंतप्रधानांनी माफी मागीतली पाहीजे अस देशपांडे (Sandeep Deshpande) म्हणाले. पंतप्रधान व्हिक्टीम कार्ड खेळत असल्याचा आरोप देखील या वेळी मनसेचे संदिप देशपांडे यांनी केला.(Sandeep Deshpande)

जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलनामुळे जनतेच्या मनातली भीती घालवली असं वक्तव्य मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलंय. तसच सरकार विरोधकांविरोधामध्ये तपास यंत्रणांचा वापर करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिडिओ वरून देखील भाष्य केलेलं आहे. ज्या पद्धतीची या देशामध्ये एक हुकुमशाही व्यवस्था उभा करण्याचा प्रयत्न करत होते की आमच्या खिशात निवडणूक आयोग पण आहे, आमच्या खशात न्यायालय पण आहे, मला असं वाटतं बर तुम्ही त्यांच्या विरोधात बोललं की घरी ईडी येणार, घरी सीबीआय येणार या सगळ्या गोष्टी होत होत्या, या तरुण मुलांनी लोकांच्या मनातली भीती घालवली आणि मला असं वाटत पत्रकारांच्या मनातली घालवली, पहिली तर गोष्ट त्यांनी पहिले लोकांची माफी मागितली पाहिजे, पंतप्रधान तुम्ही लहान मुलांच्या अंगावर पोलीस सोडले आणि लाठ्या झाडल्या त्याच्या अंगावर, व्हिक्टीम कार्ड याला इंग्रजीमध्ये शब्द व्हिक्टीम कार्ड खेळण्याचा प्रयत्न पंतप्रधान करता आता एवढ्या वेळा खेळलेत व्हिक्टीम कार्ड आणि एवढं तुम्हाला 90 वर्षाच्या बाईला लाईनीत का उभं केलेलं तुम्ही आपण घरी जाताना आपल्या आईच्या पाया पडतो, तेव्हा काय कॅमेरा घेऊन जातो का?, असा सवालही मनसे नेते संदिप देशपांडे यांनी केला आहे.

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओमध्ये नेमकं काय म्हटलंय?

पंतप्रधान मोदी म्हणाले, 'जंतर मंतरवर जे घडले ते देश आणि जगाने पाहिले. काही उपद्रवी मुलांनी अशी अश्लील आणि असभ्य भाषा वापरली जी एका सुसंस्कृत समाजाला शोभणारी नाही. मला शिवीगाळ केली गेली आणि माझ्या दिवंगत आईलाही शिवीगाळ करण्यात आली. पण मला जर या वस्तुस्थितीबद्दल बोलायचे आहे की, लहानपणी चुका होतात आणि त्यात सुधारणा करण्याची संधीही असते. समाजातील संताप मी पूर्णपणे समजू शकतो. आपल्या मुली अशा प्रकारची भाषा कशी बोलू शकतात याचा मला धक्का बसला. पण हीच वेळ आहे की, आपण या मुलांना आपलेसे करून त्यांना योग्य मार्ग दाखवावा. ही मुलं भरकटलेली आहेत आणि त्यांना योग्य मार्ग दाखवणे हे आपले काम आहे.'

तसंच, 'या मुलांना शिक्षा केल्याने, न्यायालयात फेऱ्या मारायला लावल्याने आणि समाजात त्यांचा छळ केल्याने परिस्थितीत काहीही बदल होणार नाही. त्यामुळे मला त्यांना माफ करायचे आहे. समाजानेही माझं हे बोलणं स्वीकारले पाहिजे. कारण माझ्या मनात एकच भावना आहे. कधीकधी आपली जीभ दातांमध्ये येते आणि रक्त येते पण आपण दात तोडत नाहीत. कारण दात आपले आहेत जीभ आपली आहे आणि मुलेही आपलीच आहेत. त्यांना योग्य मार्ग दाखवणे हे आपले काम आहे. त्यांनी पुढे देशातील तरुणांना योग्य मार्ग दाखवायचे सांगत त्यांना आवाहन केले की, 'मार्ग भरकटलेल्यांना मार्ग दाखवणे अवघड आहे पण हे कठीण काम आपल्याला करायला पाहिजे. म्हणूनच, मी या मुलांना सांगतो, चला, आपण देशासाठी एकत्र पुढे जाऊया. काहीतरी नवीन शिकुया, चुकांमधून शिकुया आणि आपली स्वप्ने घेऊन पुढे जाऊया. देश वेगाने प्रगती करत आहे आणि पुढेही करणार आहे आणि माझे स्वप्न आहे की तुम्हीसुद्धा नक्कीच प्रगती कराल. मी तुमच्यासाठी जगतो, मी तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करतो. त्यामुळे चला आपण सर्वजण एकत्र मिळून आपल्या देशाला पुढे घेऊन जाऊया.'

Author : जयदीप मेढे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha