Jaddanbai life Story: 'धुरंधर'मधील धुव्वांधार भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता अर्थात संजय दत्तचा चाहतावर्ग आणखी मोठा होत चालला आहे. आपल्या कारकिर्दीत संजय दत्तने विविध चित्रपटात मुख्य भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
संजय दत्तचे वडील सुनील दत्त आणि आई नर्गिस दत्त हे देखील सेलिब्रिटी होते. आपल्या आई - वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत, संजय दत्तने बॉलिवूडमध्ये काम केलं. तसेच बरीच प्रसिद्धी मिळवली. विशेष म्हणजे, संजय दत्तची आई, नर्गिस यांनीही आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवले.
नर्गिस यांनी सिनेसृष्टीत येण्याचा निर्णय आई जद्दनबाई यांच्यामुळे घेतला असल्याची माहिती आहे. नर्गिस यांची आई एक अभिनेत्री आणि गायिका होती. त्यांची बॉलिवूडची पहिली महिला कंपोजर म्हणूनही ओळख आहे. संजय दत्त हे त्यांचे नातू आणि सुनील दत्त हे त्यांचे जावई होते. परंतु, जद्दनबाई यांच्याबद्दल एक गोष्ट अनेक लोकांना ठाऊक नाही. जद्दनबाई एक तवायफ होत्या. जद्दनबाई यांचा प्रवास कसा होता? खडतर प्रवासातून त्यांनी कसं नाव कमावलं? पाहूयात.
जद्दनबाईंचा प्रवास मोठा, सिनेसृष्टीत मोठं योगदान (Sanjay Dutt Grandmother History And Unknown Facts)
जद्दनबाई एक तवायफ होत्या. त्यांची आईसुद्धा एक तवायफ होती. जद्दनबाई यांचे संपूर्ण नाव जद्दनबाई हुसेन असे होते. त्यांचा जन्म अंदाजे 1892 साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मिया जान आणि त्यांच्या आईचे नाव दलीपाबाई असे होते. जद्दनबाई एक गायिका आणि संगीतकार होत्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीत बॉलिवूड चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून काम केलं.
मिळालेल्या माहितीनुसार, जद्दनबाईंनी प्रोडक्शन कंपनीही चालू केली होती. या प्रोडक्शन कंपनीचे नाव 'संगीत फिल्म्स' असे होते. जद्दनबाईंनी संगीताचे धडे कोलकात्यातली श्रीमंत गणपत राव (भैया साहेब सिंधिया) यांच्याकडून घेतले होते. आपल्या कौशल्याच्या जोरावर त्यांनी बरीच प्रसिद्धी मिळवली. त्या काळी लोकप्रियतेच्या बाबतीत त्यांनी आपल्या आईलाही मागे टाकले होते, अशी माहिती आहे.
जद्दनबाई हुसेन यांच्याबद्दल आणखी रंजक गोष्ट म्हणजे, त्यांनी एक, दोन वेळा नसून, तीन वेळा लग्न केले होते. त्यांचे पहिले लग्न नरोत्तमदास खत्री या हिंदू व्यक्तीशी झाले होते. त्यानंतर त्यांनी दुसरे लग्न उस्ताद इरशाद मीर खान यांच्याशी केले होते. पहिल्या आणि दुसऱ्या लग्नातून अभिनेत्रीला प्रत्येकी एक मुलगा होता. त्यांचे तिसरे लग्न मोहनचंद उत्तचंद त्यागी यांच्याशी झाले होते. नर्गिस या अभिनेत्री मोहनचंद आणि जद्दनबाई यांची मुलगी होती.
Author : एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क

