Sanjay Kakde and Sharad Pawar: काँग्रेसचे विचारधारा घाणेरडी झाली आहे. सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य करुनही शरद पवार शांत का बसले आहेत? शरद पवारांनी काँग्रेसची (Congress) साथ सोडून महाविकास आघाडीमधून बाहेर पडावे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय काकडे (Sanjay Kakde) यांनी केले.
ते बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आम्ही काँग्रेसच्या लोकांनी यांनी शेण खाल्लं आहे आणि घाण खाल्ली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना पक्षातून काढून टाका. आम्ही 48 तास वाट पाहू आणि रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, अशा इशाराही संजय काकडे यांनी दिला. (Maharashtra Politics news)
इंदिरा गांधी यांच्यावेळी त्यांना गुंगी गुडिया बोलल्यानंतर वादळ उठले होते. विरोधाकांनी राजकीय, वैचारिक बोलावे. सुनेत्रा पवारांबाबत केलेल्या या वक्तव्यावरुन महायुती रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याला रस्त्यावर फिरू देणार नाही. काँग्रेसने जशास तसे उत्तर द्यावं. आम्हाला तेच हवं आहे. आम्ही वाट पाहत आहोत, असे संजय काकडे यांनी म्हटले. यावर आता काँग्रेस आणि शरद पवार गटाचे नेते काय प्रतिक्रिया देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
NCP: राष्ट्रवादी काँग्रेसकडून नव्या महिला प्रदेशाध्यक्षाची निवड
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून बुधवारी वैशाली नागवडे यांची पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. यानंतर वैशाली नागवडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राजकारणाची सुरुवात अजित पवारांमुळे घडलो आहे. आज ते हवे होते. आज सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पत्र मिळाले आहे. आज जबाबदारी खूप वाढली आहे. दादांची कामाचा माणूस ही ओळख आम्हाला आणखी तळागाळात घेऊन जायची आहे, असे नागवडे यांनी सांगितले. पुणे शहरात आम्ही काल आंदोलन केलं आहे. शिव शाहू फुले आंबेडकर विचारधारा जपणारा महाराष्ट्र आहे. काँग्रेसला हे कळायला हवे. किती मोठ दुःख पचवून त्या कशा प्रकारे पदावर आल्या हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत जबाबदारीने बोलणं गरजेचे होतं. एकीकडे बारामतीत विधानसभेला मदत केली म्हणायचं आणि दुसरीकडे अशा प्रकारे टीका करायची, हे काँग्रेसला शोभणारे नाही, असे वैशाली नागवडे यांनी म्हटले.
पक्षातील सगळ्यांनी जबाबदारी समजून काम करायला हवे. पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर उभा राहत असतो. संघटनेत आमच्या नेत्याबद्दल अनेकांना अभिमान असतो. त्यातून सूरज चव्हाण यांनी जे कृत्य केले ते घडले असावे. पुन्हा असे काही होणार नाही, असे वैशाली नागवडे यांनी सांगितले.

