Dailyhunt
संतापजनक! पुणे-मुंबई मिसिंग लिंकवर जीवघेणं दृष्य, क्रेनमध्ये बसून कामगाराने बनवलं रील

संतापजनक! पुणे-मुंबई मिसिंग लिंकवर जीवघेणं दृष्य, क्रेनमध्ये बसून कामगाराने बनवलं रील

ABP माझा 1 week ago

Mumbai Pune Missing Link News :पुणे-मुंबई मिसिंग लिंक वर एक धक्कादायक पद्धतीने करण्यात आली आहे. ही दृश्य पाहिल्यावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात MSRDC प्रवाश्यांच्या जीवाशी खेळतेय का?

असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. मिसिंग लिंकवरील 180 फूट उंचीच्या पुलाचं किरकोळ काम सुरु आहे, त्यावेळी पुलाच्या वरच्या टोकावर क्रेनमध्ये बसून एका कामगाराने हे संतापजनक रील बनवलं आहे.

क्रेनची ट्रॉलीमध्ये चार ते पाच जण काम करत असल्याचं, ट्रॉली मिसिंग लिंकच्या पुलावर असल्याचं आणि मिसिंग लिंकवरुन शेकडो वाहनं धावत असल्याचं स्पष्टपणे दिसतंय. तरी हा कामगार खुशाल रील बनवतोय. रील बनवत असताना कामगारांचे दुर्लक्ष झाले अन ट्रॉली थेट पुलावर कोसळली तर किती मोठी दुर्घटना घडेल, याचा विचार केला तरी अंगावर थरकाप उडतोय. कारण पुलाखाली थेट दरी आहे, हा सगळा विचार करता MSRDC नेमकं काय करत आहे? ज्या कंपनीला मिसिंग लिंकच्या कामाचं कंत्राट दिलंय, त्यांचं ही याकडे लक्ष नाही का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालाय. खरं तर मिसिंग लिंकच्या या पुलावर वाहन चालक फोटो अथवा सेल्फी काढायला थांबले तरी कारवाईचा बडगा उगारला जातोय. कारण पुलावर वाहनं थांबवणं म्हणजे जीवाशी खेळल्यासारखं आहे. त्यामुळं महामार्ग पोलिसांच्या कारवाईचं स्वागतच केलं गेलं पण त्याचवेळी हा जीवघेणा रील पाहिल्यानंतर नेमकी काय पावलं उचलली जातात हे पाहणं महत्वाचं आहे.

मिसिंग लिंकवर फोटो किंवा सेल्फीसाठी थांबल्यास प्रवाशांना आर्थिक दंड भरावा लागणार

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 'मिसिंग लिंक' सुरू झाल्यानंतर काही प्रवासी सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी वाहनं थांबवत असल्याचं समोर आलं आहे. मात्र हा प्रकार आता प्रवाशांना महागात पडणार असून महामार्ग पोलिसांनी यावर कठोर कारवाई सुरू केली आहे. मिसिंग लिंकवर फोटो किंवा सेल्फीसाठी थांबल्यास प्रवाशांना आर्थिक दंड लागू शकतो, तसेच त्यांच्यावर गुन्हाही दाखल होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला या कारवाईला सामोरं जायचं नसेल तर मिसिंग लिंकवरुन न थांबता सुखकर प्रवास करावा, असं आवाहन महामार्ग पोलिसांनी केलं आहे.

मिसिंग लिंकवर वाहनं 100 ते 120 किमी प्रतितास वेगाने धावत असतात. अशा परिस्थितीत मध्येच थांबून फोटो काढणं हे अत्यंत धोकादायक ठरत आहे. त्यामुळेच पोलिसांनी अशा प्रकारांवर बंदी घालत दंडात्मक कारवाईला सुरुवात केली आहे.

Author : नाजीम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha