Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सरकारकडून कांद्याच्या खरेदी दरात 250 रुपयांची वाढ, तर क्विंटलला तीन हजार रुपयांचा दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी

सरकारकडून कांद्याच्या खरेदी दरात 250 रुपयांची वाढ, तर क्विंटलला तीन हजार रुपयांचा दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी

ABP माझा 4 months ago

Nashik Onion Price News : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कांद्याच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत होते.

अशातच काही प्रमाणात कांद्याच्या दरात वाढ झाल्यानं दिलासा मिळाला आहे. सरकारकडून 1 हजार 975 रुपये दरानं कांद्याची खरेदी केली जात होती. आता यामध्ये 250 रुपयांची वाढ केली आहे. आता सरकारनं कांद्याचे दर 2 हजार 125 रुपये प्रतिक्विंटल केला आहे.

आता सरकारकडून 2 हजार 125 रुपये प्रतिक्विंटने कांद्याची खरेदी केली जाणार

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला होता. सरकारकडून 1 हजार 975 रुपये दरानं कांदा खरेदी केला जात होता. पण आता 2 हजार 125 रुपये प्रतिक्विंटने कांद्याची खरेदी केली जाणार आहे. मात्र, अशातच सरकारने 3 हजार रुपये प्रतिक्विंटल दराने कांद्याची खरेदी करावी अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

सरकारने 3 हजार रुपये प्रति क्विंटल दराने कांद्याची खरेदी करावी

केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण निधी योजने अंतर्गत 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवत मे महिन्यात 1 हजार 235 रुपये प्रतिक्विंटल दराने नाफेड व एन.सी.सी.एफ मार्फत कांदा खरेदी सुरू करण्यात आली. मात्र बाजारभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी शासकीय कांदा खरेदी केंद्रांकडे पाठ फिरवल्याने मागील दोन महिन्यात केवळ 7 हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला आहे. नाफेड व एन.सी.सी.एफ.मार्फत कांदा खरेदी का वाढत नाही याचा आढावा घेण्यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी लासलगाव बाजार समितीत बैठक घेतली. त्या दरम्यान शासकीय दरापेक्षा बाजार समितीमध्ये अधिक दर मिळत असल्याने शेतकरी कांदा विक्री करत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आज कांदा दरात तब्बल 250 रुपये प्रतिक्विंटल अधिकचा दर देत 1975 रुपये दराने सुरू असलेली कांद्याची खरेदी आता 2125 रुपये प्रतिक्विंटल दराने करण्यात येणार आहे. दरम्यान, केंद्र व राज्य सरकारने 3 हजार रुपये प्रति क्विंटल दराने कांद्याची खरेदी करावी ही मागणी आजही कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कायम आहे

केंद्र सरकारने बफर स्टॉकसाठी कांदा खरेदी दर 13 टक्क्यांनी वाढवले आहेत. आता 2125 प्रतीक्विंटल दराने कांद्याची खऱेदी केली जाणार आहे. वाढीव दराची अंमलबजावणी 4 जुलै2026 पासून देशभरात झाली आहे. नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफ (NCCF) द्वारे ही खरेदी सुरू आहे

Author : संदीप जेजुरकर

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha