Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Satish Salian on Disha Salian Death High Court Result: 'मुलीला गमावून बसलो, बोलण्यासाठी काही नाही...'; कोर्टाच्या आदेशानंतर दिशा सालियनच्या वडिलांचा कंठ दाटला, म्हणाले...

Satish Salian on Disha Salian Death High Court Result: 'मुलीला गमावून बसलो, बोलण्यासाठी काही नाही...'; कोर्टाच्या आदेशानंतर दिशा सालियनच्या वडिलांचा कंठ दाटला, म्हणाले...

ABP माझा 1 week ago

Disha Salian Death Case Highcourt Result: सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन (Disha Salian ) यांच्या मृत्यू प्रकरणात आज मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai Highcourt) महत्त्वाचा आदेश सुनावला.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयकडे (CBI) सोपविण्यात आला असून दिशाचे वडील सतीश सालियन (Satish Salian) यांचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाने म्हटले. गेल्या शुक्रवारी या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. आज ( 2 सप्टेंबर 2026) रोजी कोर्टाने सीबीआयने या प्रकरणात लक्ष घालण्याचा मोठा आदेश दिला. दरम्यान, दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी कोर्टाचे आभार मानले. हायकोर्टाच्या निकालानंतर ते बाहेर भावूक झाले होते. न्यायालयाबाहेर माध्यमांसमोर उभे असताना त्यांच्या डोळ्यांत मुलीला गमावल्याचं ओझं स्पष्ट दिसत होतं. त्यांच्याकडे बोलण्यासाठी शब्द नव्हते.

8 जून 2020ला दिशाचा मालाड येथील राहत्या घरातून पडून मृत्यू झाला होता. दिशाने अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबतदेखील काही काळ काम केलेलं. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सविस्तर तपास करत दिशाने आत्महत्या केल्याचा दावा केला होता. मार्च 2025 मध्ये देशाचे वडील सतीश सालियन यांनी दिशावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान, न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर दिशाचे वडील भावूक झाले होते.

काय म्हणाले सतीश सालियन?

या निकालानंतर दिशा सालियानचे वडील सतीश सालियान भावूक झाले होते. ते म्हणाले ' मी गेल्या सहा वर्षांपासून या निकालाची वाट बघत होतो. मी माझ्या मुलीला गमावून बसलो आहे.माझ्याकडे बोलण्यासाठी काहीही नाही. मी कोर्टाचे आभार मानतो. हा निर्णय दिल्यानंतर मी न्यायाधीशांसमोर हात जोडले आभार मानले. आज मला बरं वाटतंय. एवढी मेहनत केली सगळ्यांनी..' कोर्टाचा आदेश मिळाला असला तरी मुलीच्या न्यायासाठी झगडणार्‍या सतीश सालियन यांचा कंठ दाटून आला होता.

मुंबई उच्च न्यायालयाने दिशा सालियन मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देताच दिशाचे वडील सतिश सालियान भाऊक झाले, कोर्टाचे त्यांनी हात जोडत आभार मानले. अनेक वर्ष आम्ही लढतोय अखेर कोर्टाने आमच म्हणणं ऐकत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे त्यामुळे आमच्या लढ्याला लढ्याला यश आलं आहे.अशी प्रतिक्रिया सतिश सालियान यांनी दिली आहे.

कोर्टाने नेमका काय आदेश दिला?

दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला. याप्रकरणी सीबीआय अधिकारी नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचेही कोर्टाने सांगितले आहे. न्यायालयाने सीबीआयला सतीश सालियन आणि यांचा जबाब नोंदवण्याचे आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले असून मालवणी पोलीस ठाण्याला या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्र सीबीआयकडे सोपवण्यास सांगण्यात आलं आहे. याशिवाय पुराव्यांवरून ज्याचं नाव समोर येईल त्याच्यावर कारवाई केली जाईल.ज्याच्या विरुद्ध पुरावा नसेल त्यांना आरोपी केलं जाणार नाही असेही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. जर सीबीआयने नकारात्मक अहवाल सादर केला तर त्यावर आक्षेप घेण्याचा आणि प्रोटेस्ट पिटिशन दाखल करण्याचा अधिकार दिशाच्या वडिलांना राहील असेही न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे.

Author : abp majha web team

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha