Kangana Ranaut Reaction On Girija Oak:अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut) सध्या तिच्या 'भारत भाग्य विधाता' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या निमित्ताने तिची एक सोशल मीडियावरील एक क्लिप चर्चेत आलीय.
या फिल्मच्या प्रमोशनसाठी ती नॅशनल क्रश गिरिजा ओकला (Girija Oak) भेटली. गिरिजा मोकळेपणाने तिला मिळालेल्या प्रसिद्धीविषयी सांगताना दिसली. तिचा निळ्या साडीची आणि तिच्या लूकची सगळीकडे प्रशंसा होत असताना अभिनेत्री कंगना रनौतने गिरीजाच्या 'ब्लू साडी गर्ल' आणि 'नॅशनल क्रश' या टॅगवर हलक्याफुलक्या अंदाजात प्रतिक्रिया दिली.'आता plz तुमच्या सौंदर्याचा वापर करून आमच्या फिल्मचे प्रमोशन करा' असं ती गमतीने म्हणताना दिसली.
गिरीजा ओकवर कंगनाने केलेली प्रतिक्रिया चर्चेत
गेल्या वर्षी एका पॉडकास्टमधील गिरीजा ओकचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. विशेषतः निळ्या साडीतला तिचा लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला होता. त्यानंतर अनेकांनी तिला 'ब्लू साडी गर्ल' आणि 'नॅशनल क्रश' अशी उपाधी दिली होती. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान या विषयावर बोलताना कंगना रनौत म्हणाली, 'ही ब्लू साडीची काय चर्चा आहे? मीसुद्धा याबद्दल ऐकलंय.' कंगनाची ही प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, गिरीजा ओकने या लोकप्रियतेबद्दल बोलताना सांगितलं, 'एका पॉडकास्टमधला माझी क्लिप अचानक व्हायरल झाली. इंटरनेटवर काही गोष्टी क्षणार्धात पसरतात तसंच हेही झालं. लोक माझ्या लूकचं खूप कौतुक करत होते. पण मला वाटतं त्यात माझं काहीच यश नाही. ते माझ्या जीन्समुळे आहे. मी कशी दिसते, यासाठी मी काही कमावलेलं नाही.' यावर कंगना म्हणाली," अच्छा म्हणजे तुमच्या सौंदर्यामुळे ती क्लिप व्हायरल झाली." गमतीने कंगना म्हणाली " अरे व्वा! तुम्ही नॅशनल क्रश राहिल्या आहात. हे खरोखरच अविश्वसनीय आहे. तुम्ही आमच्या चित्रपटात आहात याचा आम्हाला खूप आनंद आहे. कृपया तुमच्या या सौंदर्याचा वापर करून आमच्या चित्रपटाचेही थोडे प्रमोशन करा." गिरीजाच्या या प्रामाणिक वक्तव्याचं सोशल मीडियावर कौतुक होत असून अनेकांनी तिच्या साधेपणाचं आणि स्पष्टवक्तेपणाचं कौतुक केलं आहे.
Author : abp majha web team

