Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
September 2026 Monthly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी सप्टेंबरचा महिना कसा असणार? 6 पैकी किती राशी होतील मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य

September 2026 Monthly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी सप्टेंबरचा महिना कसा असणार? 6 पैकी किती राशी होतील मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य

ABP माझा 1 week ago

September 2026 Monthly Horoscope : ज्योतिष शास्त्रानुसार, ऑगस्ट महिना संपून लवकरच सप्टेंबरचा (September 2026)महिना सुरु होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, हा महिना फार खास असणार आहे.

तसेच, या महिन्यापासून विविध सणांना सुरुवात होणार आहे. या महिन्यात अत्यंत महत्त्वाचे सण म्हणजेच हरितालिका, ऋषिपंचमी, गणेशोत्सव आहे. या काळात ग्रहांचे अनेक शुभ योग जुळून येतायत. त्यामुळे सप्टेंबर महिना नेमका कसा असणार आहे? याबाबत अनेकांना उत्सुकता असते. आज आपण तूळ ते मीन राशींचं मासिक राशीभविष्य (Monthly Horoscope)जाणून घेणार आहोत.

तूळ रास (Libra Monthly Horoscope September 2026)

तूळ राशीच्या लोकांसाठी सप्टेंबरचा महिना चांगला असणार आहे. या काळात तुम्हाला थोडं संयमाने काम करण्याची गरज आहे. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या कामात अनेक अडथळे जाणवतील. मनाप्रमाणे तुम्हाला काम करता येणार नाही. नोकरदार वर्गातील लोकांना सहकाऱ्यांचा चांगला सपोर्ट मिळेल. तुमची लव्ह लाईफ चांगली असेल. महिन्याच्या शेवटी तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडायला सुरुवात होईल. तोपर्यंत संयम गरजेचा आहे.

वृश्चिक रास (Scorpio Monthly Horoscope September 2026)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सप्टेंबरचा महिना फलदायी असणार आहे. या काळात तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही. महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या खर्चात वाढ झालेली दिसेल. मात्र, तुमच्यासाठी उत्पन्नाचे मार्गही खुले होतील. मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.

धनु रास (Saggitarius Monthly Horoscope September 2026)

धनु राशीसाठी सप्टेंबरचा महिना चांगला असणार आहे. या काळात तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळू शकते. तसेच, जे लोक अविवाहित आहेत त्यांच्यासाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. काही घरगुती जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडाव्यात. धार्मिक कार्यात तुमचा सहभाग महत्त्वाचा ठरेल. तसेच, समाजात तुमचा मान-सन्मान टिकून राहील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल.

मकर रास (Capricorn Monthly Horoscope September 2026)

मकर राशीच्या लोकांसाठी महिन्याची सुरुवात फार चांगली असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे काम करता येईल. तसेच, रोजगाराच्या नवीन संधी तुमच्यासाठी उपलब्ध होतील. जर तुम्हाला पैशांची गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी हा चांगला कालावधी असणार आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या संपत्तीत भरभराट पाहायला मिळेल. फक्त तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

कुंभ रास (Aquarius Monthly Horoscope September 2026)

कुंभ राशीच्या लोकांसाठी महिन्याची सुरुवात मिश्रीत फलदायी असणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला अनेक नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. कोर्ट कचेरीच्या संदर्भातील कामे सुरु असतील तर त्याला गती मिळेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढेल. राजकारणाच्या बाबतीत तुम्ही काही ठोस पावलं उचलू नका. तसेच, तुमच्या वाणीवर आणि रागावर नियंत्रण ठेवा.

मीन रास (Pisces Monthly Horoscope September 2026)

मीन राशीसाठी सप्टेंबरचा महिना सकारात्मक असणार आहे. या काळात तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा टिकून राहील. तसेच, या महिन्यात तुमचे अनेक प्रवासाला जाण्याचे योग जुळून येणार आहेत. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे. बाहेरचं अन्नपदार्थ खाणं टाळा. मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर बातम्या :

Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनला तुमच्या भावाच्या राशीनुसार बांधा 'या' रंगाची राखी; वाचा मेष ते मीन 12 राशींनुसार शुभ रंग आणि महत्त्व

Author : एबीपी माझा वेब टीम

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha